Rohit Sharma Struggle Against Devdutt Padikkal Bowling : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही चौथ्या सामन्यासाठी कसून सराव करतोय. पण नेट्समध्येही तो अडखळत खेळताना दिसल्यामुळे चौथ्या कसोटीतही त्याचं काही खरं नाही असाच काहीसा सीन क्रिएट झालाय.
सराव सामन्यातही फ्लॉप शो
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा कसोटी सामन्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला मुकल्यावर बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केल्यावरही त्याच्या भात्यातून धावा झाल्या नाहीत. बॉक्सिंग डे टेस्ट आधी नेट्समध्येही हिटमॅनचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्याचा नेट्समधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पार्ट टाइम बॉलर असणाऱ्या देवदत्त पडिक्कलच्या गोलंदाजीवर चाचपडत खेळताना दिसते आहे. हा सीन रोहितचा सराव कच्चा असल्याचे चित्र निर्माण करणारा आहे.
मागील १३ सामन्यातील आकडेवारी टेन्शन वाढवणारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीला मुकल्यावर अॅडिलिड कसोटी सामन्यातून रोहितनं भारतीय संघात कमबॅक केले. दोन कसोटी सामन्यातील तीन डावात त्याने फक्त १९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे कसोटीतील मागील १३ सामन्यातील त्याची कामगिरी ढासळल्याचे दिसते. १३ डावात त्याने ११.६९ च्या सरासरीनं फक्त १५२ धावा केल्या आहेत. याच फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. रोहित शर्माची ही आकडेवारी त्याच्यासह टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी आहे.
रोहित शर्मा बॅटनं प्रत्युत्तर देणार का?
कसोटी सामन्यात सातत्याने पदरी पडणाऱ्या अपयशामुळे रोहित शर्मा कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. पडिक्कलच्या गोलंदाजीवरील त्याची अवस्था पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील खेळपट्टी फलंदाजांना बऱ्यापैकी साथ देते. त्यामुळे याचा फायदा उठवत रोहित शर्मा गमावलेला फॉर्म पुन्हा मिळवून टिकाकारांना आपल्या बॅटने उत्तर देणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Rohit Sharma Struggle Against Part Timer Devdutt Padikkal In Nets Watch Viral Video Ahead India vs Australia Boxing Day Test melbourne
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.