Rohit Sharma Catch, IPL 2022 MI vs LSG Live: वानखेडे मैदानावर तब्बल हजार दिवसांपेक्षाही जास्त दिवसानंतर मुंबई इंडियन्सने पाय ठेवला. IPLचे आपले पहिले सात सामने गमावल्यानंतर आठव्या सामन्यात मुंबईला आवडत्या मैदानात सामना खेळायची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी घेतली. सामन्यात लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकचा रोहितने घेतलेला झेल विशेष चर्चेचा विषय ठरला.
मुंबईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजीने डावाची सुरूवात केली. डी कॉक आणि राहुल यांच्या समोर मुंबईने तीन षटकात केवळ २० धावा दिल्या होत्या. त्यामुळे चौथ्या षटकात रोहितने भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली. फलंदाज मोठा फटका खेळणार, याची साऱ्यांनाच कल्पना होती. त्यामुळे सीमारेषेवर फिल्डर तैनात होता. डी कॉकने अपेक्षेप्रमाणे फटका मारला. पण तिलक वर्माच्या हातावर टप्पा पडून चेंडू षटकार गेला. मुंबईकर त्यामुळे काहीसे हळहळले. पण पुढच्याच चेंडूवर फुलटॉस बॉल डी कॉकने मारला. चेंडूवर वेगाने रोहितच्या दिशेने जात असतानाच त्याने अफलातून असा झेल घेतला. पाहा व्हिडीओ-
क्विंटन डी कॉक गेली काही वर्षे मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता, त्यामुळे वानखेडेच्या मैदानावर त्याच्याकडून मोठ्या खेळीची साऱ्यांनाच अपेक्षा होती. पण तसं घडलं नाही. बुमराहच्या संयमी आणि भेदक माऱ्यापुढे त्याला स्वस्तात बाद व्हावे लागले. तो चेंडूत एका षटकारासह १० धावा काढून बाद झाला.