Team India IND vs ENG 1st ODI: Virat Kohli आजच्या सामन्याला मुकणार? कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी, असा असू शकतो संघ

कोणाला मिळणार संघातून डच्चू.. वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 02:22 PM2022-07-12T14:22:38+5:302022-07-12T14:23:19+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Team India Playing XI Prediction for IND vs ENG 1st ODI as Virat Kohli Likely to miss due to injury | Team India IND vs ENG 1st ODI: Virat Kohli आजच्या सामन्याला मुकणार? कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी, असा असू शकतो संघ

Team India IND vs ENG 1st ODI: Virat Kohli आजच्या सामन्याला मुकणार? कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी, असा असू शकतो संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Playing XI Prediction IND vs ENG 1st ODI: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरूवातीला खेळण्यात आलेली एकमेव कसोटी भारताने हरली. पण त्यानंतर टी२० मालिकेत भारताला २-१ ने विजय मिळाला. आता आजपासून भारत-इंग्लंड यांच्या तीन सामन्यांची वन डे मालिका खेळण्यात येणार आहे. यातील पहिला सामना आज भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ नंतर सुरू होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मासह संपूर्ण संघ सज्ज आहे. पण विराट कोहलीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे तो सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताचा संघ नक्की कसा असेल अन् कोणाला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळेल पाहूया...

भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ वन डे क्रिकेटमध्ये खूपच्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जागतिक क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या तर भारत चौथ्या स्थानी आहे. अशा वेळी भारतीय संघाला आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचे आव्हान असणार आहे. दीर्घ कालावधीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना मैदानात सलामीला एकत्र पाहता येईल. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. विराट दुखापतीतून सावरला नाही तर सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येईल. त्यामुळे श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या तर सहाव्या क्रमांकावर रिषभ पंत जागा राखून आहेत.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर हे दोघे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. रोहितला वेगवान गोलंदाजी अधिक धारदार ठेवायची असल्यास शार्दूलच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीची जबाबादारी युजवेंद्र चहल सांभाळेल. तर वेगवान गोलंदाजीसाठी भारताचे स्टार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी संघात असतील.

असा असू शकतो भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली/ श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर/ प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

Web Title: Rohit Sharma Team India Playing XI Prediction for IND vs ENG 1st ODI as Virat Kohli Likely to miss due to injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.