Rohit Sharma Baby AB Dewald Brewis, IPL 2022: मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात पराभव झाला. मुंबईचा हा यंदाच्या हंगामातील सलग पाचवा पराभव ठरला. मुंबईने IPL 2022 मध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकला नसल्याने त्यांचे प्लेऑफ्सचे गणित फिसकटण्याची दाट शक्यता आहे. पंजाबने बुधवारच्या सामन्यात मुंबईला १९९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेबी एबी डेवाल्ड ब्रेविस ४९ धावांवर बाद झाला. दमदार फटकेबाजी करत असताना तो माघारी परतला. त्याच्या बाद होण्याचा संबंध चाहत्यांनी थेट रोहित शर्माशी लावला आणि त्याच्यावर टीका केली.
डेवाल्ड चांगल्या लयीत खेळत होता. सुरूवातीला काही चेंडू नीट खेळल्यानंतर त्याने राहुल चहरच्या स्पिन गोलंदाजीवर एका षटकात एक चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या या पराक्रमानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आऊट घेण्यात आला. त्यावेळी मैदानात सचिन तेंडुलकर, महेला जयवर्धने, रॉबिन सिंग यांच्यासह रोहित शर्माही त्याची पाठ थोपटण्यासाठी आला. रोहितने बेबी एबीशी काही सेकंद गप्पा मारल्या आणि सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच बेबी एबी बाद झाला. त्यावरून चाहत्यांनी रोहितला टीकेचे लक्ष्य केले. रोहितच्या टिप्समुळेच बेबी एबी बाद झाला अशी टीका त्याच्यावर केली गेली. पाहूया काही निवडक ट्वीट्स-
--
--
--
दरम्यान, बेबी एबी २५ चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी करून बाद झाला. तिलक वर्मादेखील ३७ धावांवर धावचीत झाला. मुंबईची शेवटची आशा असलेल्या सूर्यकुमार यादवने देखील ४३ धावांवर खेळताना विकेट बहाल केली. त्यामुळे मुंबईचा १२ धावांनी पराभव झाला.