Rohit Sharma trolled : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने स्वातंत्र्य दिनी सोशल मीडियावर त्याचा एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याच्या हातात तिरंगा दिसतोय आणि त्याच फोटोवरून नेटिझन्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या या फोटोत नेटिझन्सना फोटोशॉपचा वापर झालेला दिसला आणि त्यांनी त्यातील चूक शोधून काढताना हिटमॅनला ट्रोल करण्यास सुरुवात केले.
रोहित शर्मा सध्या विश्रांती करतोय. इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रोहित मायदेशात परतला आहे आणि आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. २७ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा होणार आहे आणि २० तारखेला भारतीय संघ यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे. त्याआधी भारतीय खेळाडू कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेला विराट कोहलीही सरावाला लागला आहे. हार्दिक पांड्या कुटुंबियांसोबत फिरायला गेला आहे. दरम्यान, मुंबईत असलेल्या रोहितमुळे सोमवारी मुंबई पोलिसांचं काम वाढल्याचं पाहायला मिळालं.
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)