इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती. पण, यातील सर्वाधिक रक्कम ही ऑस्ट्रेलियाच्या स्पेशल 13 खेळाडूंसाठी मोजली गेली आहे. याच लिलाव प्रक्रियेदरम्यान हिटमॅन रोहित शर्मानंमुंबई इंडियन्सच्या मालकांना महत्त्वाचा प्रश्न विचारून बुचकळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला.
मुंबई इंडियन्सनं लिलावात पहिल्याच प्रयत्नात ख्रिस लीनला दोन कोटींच्या मूळ किमतीत आपल्या संघात घेतले. त्यानंतर मुंबईनं नॅथन कोल्टर नीलसाठी 8 कोटी रुपये मोजले. यासह मुंबई इंडियन्सनं गुरुवारी सौरभ तिवारी (50 लाख), मोहसीन खान (20 लाख), दिग्विजय देशमुख (20 लाख), प्रिंस बलवंत राय (20 लाख) या खेळाडूंनाही करारबद्ध केले.
लिलाव सुरू असताना मुंबई इंडियन्सच्या मालकांनी इंस्टावर लाईव्ह व्हिडीओ अपलोड केला. त्यावेळी रोहितनं त्यांना हा प्रश्न विचारला. रोहितनं गमतीनं विचारलं की,''रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? देशाला हे जाणून घ्यायचे आहे.''
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
Web Title: Rohit Sharma trolls Mumbai Indians after they stack up their team in IPL 2020 auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.