मुंबई - इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. BCCI ने भारतीय दुतावासाला भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नेटिझन्सकडून BCCI ची कानउघडणी करण्यात आली.
या फोटोत केवळ विराटची पत्नी वगळता अन्य कोणत्याही खेळाडूची पत्नी उपस्थित नव्हती. त्यावरून काहींनी BCCIच्या दुटप्पी भूमिकेवर हल्लाबोल चढवला. इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या दोन आठवड्यापर्यंत खेळाडूंना आपापल्या पत्नींना भेटता येणार नसल्याचा नियम असताना अनुष्का येथे काय करतेय, असा सवाल अनेकांनी विचारला. एकाने तर BCCI विराटसाठी एक न्याय आणि अन्य खेळाडूंसाठी वेगळा न्याय असल्याची प्रतिक्रिया दिली आणि BCCI दुटप्पी असल्याचे मत व्यक्त केले.
कसोटी संघात समाविष्ट नसलेल्या रोहित शर्माने BCCI दुटप्पी या ट्विटला लाइक करून अप्रत्यक्षरित्या त्या मतावर सहमती दर्शवली आहे.