Rohit Sharma DRS Controversy Video, IPL 2022 MI vs KKR: मुंबई इंडियन्सविरूद्ध कोलकाता संघाने २० षटकांत १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला केवळ ११३ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ५२ धावांनी हार पत्करावी लागली. पहिल्या डावात व्यंकटेश अय्यर (४३) आणि नितीश राणा (४३) यांच्या खेळीच्या जोरावर KKR ने १६०चा टप्पा ओलांडला होता. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ५ बळी टिपले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या बाबतीत एक विचित्र गोष्ट घडली आणि तो कमनशिबी ठरल्याचे दिसून आले.
टीम साऊदीने पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू रोहित शर्माला टाकला. रोहित शर्माच्या बॅटच्या जवळून चेंडू मांडीला लागला आणि मागे यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनने उत्तम झेल टिपला. जोरदार अपील झाल्यानंतर मैदानावरील पंचांनी रोहितला नाबाद ठरवले. पण KKR ने DRSची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार, रिव्ह्यू पाहण्यात आला, त्यावेळी रोहितच्या बॅटजवळून चेंडू जात असताना स्पाईक दिसला. तसा स्पाईक दिसला म्हणजे चेंडू एखाद्या गोष्टीला लागला असल्याचा निष्कर्ष काढला जातो. त्यानुसार, चेंडू बॅटजवळ असताना स्पाईक दिसल्याने रोहितला बाद ठरवण्यात आले. पण वादाचा मुद्दा असा की रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागायच्या आधीही तो स्पाईक दिसून आला. त्यावेळी चेंडू हवेत असूनही तसं का झालं याचा कोणालाच उलगडा झाला नाही. त्यामुळे रोहितच्या विकेटवरून वाद निर्माण झाल्याचं दिसून आले.
--
--
--
--