मुंबई : बीसीसीआयच्या नव्या दहा नियमांची चर्चा होताच कर्णधार रोहित शर्मा कमालीचा नाराज झाला. या नियमाबद्दल कोणी सांगितले? बीसीसीआयकडून अधिकृत माहिती तुम्हाला आली का? आधी ती येऊ द्या आणि मग आपण त्यावर बोलू....असे उत्तर रोहितने शनिवारी माध्यमांना दिले. नव्या दहा नियमानुसार भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असेल.
व्हिडीओ झाला व्हायरल...
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आगरकारांशी बोलताना दिसला. ते संभाषण माइकमध्ये कैद झाले. ‘अब मेरे को बैठना पडेगा सेक्रेटरी के साथ.. फॅमिली वॅमिली का डिस्कस करने के लिए. सब मेरे को बोल रहे है (आता मला सचिवांसोबत चर्चेसाठी बसावे लागेल. ते फॅमिलीच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यासाठी. सर्व मलाच नावं ठेवत आहेत.) रोहित बीसीसीआयच्या नव्या दहा सूत्रींबाबत बोलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच रोहित नाराज असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या व्हिडीओमुळे ही शक्यता बळावली आहे.
Web Title: Rohit Sharma upset over BCCI's ten points...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.