रोहित शर्माने मुंबईच्या रस्त्यावर लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद; पाहा धमाल Video

भारताचा संघ या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:58 PM2022-06-15T15:58:59+5:302022-06-15T16:08:21+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma viral video playing gully cricket with youth on the roads of worli mumbai watch video tweet | रोहित शर्माने मुंबईच्या रस्त्यावर लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद; पाहा धमाल Video

रोहित शर्माने मुंबईच्या रस्त्यावर लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद; पाहा धमाल Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma gully cricket, viral video: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अशा बड्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करत आहेत. या दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा तरूणांसोबत मुंबईच्या रस्त्यांवर गली क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतोय. पण यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मशी झगडणाऱ्या रोहितची बॅट येथेही शांतच दिसली.

रोहित शर्मा या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याच वेळी, इंग्लंडच्या आव्हानात्मक आणि दीर्घ दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहित शर्मा पुन्हा एकदा बॅट हातात धरून क्रिकेटचा आनंद लुटताना दिसला. हिटमॅन मुंबईतील रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला. तो वरळीच्या रस्त्यावर तरूणांसोबत बॅटिंग एन्जॉय करताना दिसला. मात्र, रोहित येथेही फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाल्याचे दिसून आले. पाहा Video-

रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रोहित दोघांचीही कामगिरी खराब झाली. मुंबईला १४ पैकी १० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्मालादेखील १४ सामन्यात एकही अर्धशतक झळकावता आला नाही.

Web Title: Rohit Sharma viral video playing gully cricket with youth on the roads of worli mumbai watch video tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.