Join us  

रोहित शर्मा, विराट कोहली यांना पुन्हा विश्रांती; किंग कोहलीसाठी विशेष चार्टर विमान

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्यांची विश्रांती देण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 6:11 PM

Open in App

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्यांची विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी व तीन सामन्यांच्या वन डे मालिकेनंतर रोहित शर्माविराट कोहली या सीनियर खेळाडूंना पुन्हा विश्रांती मिळाली आहे. वन डे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत रोहित व विराट यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले देखील नव्हते आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत त्यांचा संघात समावेश केला गेलेला नाही. अशात दोन्ही खेळाडू आशिया चषक २०२३ स्पर्धेत पुन्हा मैदानावर खेळताना दिसतील. हे दोन्ही खेळाडूंचा मायदेशाच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून ग्लोबल एअर कंपनीने विराटसाठी विशेष विमानाची सोय केली आहे. 

आशिया चषक स्पर्धेपूर्वी २४ ते २९ ऑगस्ट या कालावधीत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भारतीय संघाचा कॅम्प लागणार आहे आणि त्यासाठी हे दोन्ही खेळाडू तेथे दाखल होतील. रोहित व विराट यांना ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती दिली गेली आहे, कारण २०२४ मध्ये होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय युवा खेळाडूंना संधी देऊ इच्छित आहे.रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारताचे नेतृत्व सांभाळले होते आणि त्यानंतर ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी ही हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे.  

या दोघांनी भारताच्या दिशेने प्रवासाचे अपडेट्स त्यांच्या फॅन्सला दिले आहेत आणि दोघानीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. 

भारताचा ट्वेंटी-२० संघ - इशान किशन, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( उपकर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या ( कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार  ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून)दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून)पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून)

सर्व सामने - जिओ सिमेना व फॅन कोडवर  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीएशिया कप 2022
Open in App