Join us  

रोहित-विराटला संघाबाहेर काढणे धोकादायक - जो रूट

Joe Root: ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वय वाढत चालले; पण त्यांच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दोघांच्या वयाची सतत चर्चा होत असते. या दोघांना संघाबाहेर काढणे अतिशय धोकादायक पाऊल ठरेल,’ असे मत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ज्यो रूट याने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:00 AM

Open in App

लंडन- ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वय वाढत चालले; पण त्यांच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. दोघांच्या वयाची सतत चर्चा होत असते. या दोघांना संघाबाहेर काढणे अतिशय धोकादायक पाऊल ठरेल,’ असे मत इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ज्यो रूट याने व्यक्त केले आहे.आशिया चषक स्पर्धेमध्ये रोहितने दोन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली.  विराट कोहली याच स्पर्धेत ४७ वे एकदिवसीय शतक ठोकले. रोहित एप्रिलमध्ये ३६ वर्षांचा झाला. विराट कोहली ५ नोव्हेंबरला ३५ वर्षांचा होईल. इतकी यशस्वी कामगिरी करणाऱ्या दोन्ही दिग्गजांच्या वयाची चर्चा का केली जाते, हे मुळात चुकीचे असल्याचे मत रूटने व्यक्त केले.

रूट म्हणाला, ‘माझ्या मते रोहित आणि विराटला वयाच्या कारणावरून बाहेर काढणे धोकादायक ठरेल. उदा. ख्रिस गेल किती काळ टी-२० खेळला. जगातील अनेक दिग्गज खेळाडू दीर्घकाळ टी-२० खेळत राहिले. जोपर्यंत तुम्ही फिट आहात, तोपर्यंत खेळत राहा!’

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघजो रूट