Rohit Sharma-Virat Kohli: 'एक सीरीज खेळून खेळाडू थकले..?' रोहित-विराटच्या विश्रांतीवर चाहते नाराज, मीम्स व्हायरल

Rohit Sharma-Virat Kohli: वेस्टइंडीजविरोधात तीन वनडे आणि पाच टी-20 सामने होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 10:07 PM2022-07-06T22:07:34+5:302022-07-06T22:08:08+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma-Virat Kohli: 'Players tired of playing a series..?' Fans upset over Rohit-Virat's break | Rohit Sharma-Virat Kohli: 'एक सीरीज खेळून खेळाडू थकले..?' रोहित-विराटच्या विश्रांतीवर चाहते नाराज, मीम्स व्हायरल

Rohit Sharma-Virat Kohli: 'एक सीरीज खेळून खेळाडू थकले..?' रोहित-विराटच्या विश्रांतीवर चाहते नाराज, मीम्स व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma-Virat Kohli:वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पण, त्यांच्या आरामावरुन चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हे खेळाडू आताच विश्रांती करुन आले आहेत, त्यामुळे परत त्यांना विश्रांतीची काय गरज आहे? असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार बनला आहे. संघाची घोषणा होताच सोशल मीडियावर विश्रांतीचा मुद्दा गाजला. अनेक चाहत्यांनी ट्विटरवर लिहिले की सीनियर खेळाडू फक्त एक किंवा दोन मालिकांसाठी उपलब्ध असतात. रोहित-विराटसारखे खेळाडू फक्त 1 मालिका खेळून थकले? अशाप्रकारचे मीम बनवले जात आहेत. ट्विटर युजर्सनी या विश्रांतीला खेळाडूंचा खराब फॉर्म आणि मोठ्या सीरीजमधील टीम इंडियाच्या अपयशाला जबाबदार धरले आहे.

विशेष म्हणजे, नुकतेच रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत संपूर्ण आयपीएल खेळले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका झाली. ज्यात रोहित-विराट-बुमराहला विश्रांती मिळाली, पण ऋषभ पंतने संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर आयर्लंड मालिकेतही सर्वांना विश्रांती मिळाली. आता इंग्लंडमध्ये कसोटी सामना झाला तेव्हा रोहित शर्माला कोरोना झाला. इंग्लंडविरुद्धच्या टी-20, एकदिवसीय मालिकेसाठी प्रत्येकजण उपलब्ध असेल. पण कोणीही वेस्ट इंडिजला जाणार नाही. वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्याची प्रथा बर्‍याच काळापासून सुरू आहे, परंतु प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली ते अधिकवेळा घडले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया: शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
 

Web Title: Rohit Sharma-Virat Kohli: 'Players tired of playing a series..?' Fans upset over Rohit-Virat's break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.