Join us  

Rohit Sharma, IND vs SL 2nd Test: 'रोहित.. मैं हारेगा नहीं साला...'; टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भन्नाट मीम्स व्हायरल; Pushpa स्टाईल फोटोंचा वर्षाव

मीम्स व्यतिरिक्त सचिन, सेहवाग, रैना यांसारख्या दिग्गजांनी संघाचं आणि रोहितचं कौतुकही केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:59 PM

Open in App

Rohit Sharma vs Virat Kohli, IND vs SL 2nd Test: लंकेविरूद्ध भारताने दुसरी कसोटी २३८ धावांनी जिंकत कसोटी मालिकेत पाहुण्यांना व्हाईटवॉश दिला. भारताचा पहिला डाव २५२ तर श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला. त्यानंतर भारताने दुसरा ३०३ धावांवर घोषित करत लंकेला ४४७ धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंका २०८ धावाच करू शकली. त्यामुळे भारताने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीची बरोबरी करणारे ट्रेंड्स दिसून आले. त्याशिवाय काही भन्नाट मीम्स आणि अभिनंदनपर ट्वीट्सही दिसली.

भारतीय संघाने रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून सलग १४व्या सामन्यात विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडविरूद्ध टी२० मालिका ३-०ने जिंकली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध वन डे मालिका ३-०ने आणि टी२० मालिका ३-०ने जिंकली. पाठोपाठ श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका ३-०ने तर कसोटी मालिका २-०ने जिंकली. या दणदणीत कामगिरीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने Pushpa चित्रपटातील Allu Arjun स्टाईल भन्नाट मीम शेअर करत रोहितचं अभिनंदन केलं. तसेच, दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, बीसीसाआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह अशा अनेकांनी रोहित व संघाचं अभिनंदन केलं.

--

--

--

--

--

दरम्यान, भारताने दिलेल्या महाकाय आव्हानाचा सामना करताना कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने एकाकी झुंज देत दमदार शतक ठोकलं पण त्याचे प्रयत्न फारच तोकडे पडले. श्रेयस अय्यरला सामनावीराचा किताब देण्यात आला. पहिल्या डावात ९२ आणि दुसऱ्या डावातील अर्धशतक (६७) असा दमदार खेळ केल्यामुळे त्याचा गौरव करण्यात आला. त्याशिवाय, मालिकेत पहिल्या सामन्यात ९६, दुसऱ्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण करणाऱ्या रिषभ पंतला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू सुरंगा लकमल याची ही शेवटची कसोटी होती. त्याला रोहित, विराट व टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी हस्तांदोलन करत निरोप दिला आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहलीसचिन तेंडुलकर
Open in App