मुंबई : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० संघात रोहित शर्माला संधी देण्यात आलेली नाही. रोहितच्या नावावर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चार शतके आहेत. पण तरीही त्याला विस्डनने आपल्या या दशकातील ट्वेन्टी-२० संघात स्थान दिलेले नाही.
विस्डनच्या या संघात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोनच भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे या संघाचे कर्णधारपद कोहलीकडे सोपवण्यात आलेले नाही. या संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचकडे सोपवण्यात आले आहे.
या संघात फिंच आणि कॉलिन मुनरो यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. शेन वॉटसन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन्ही ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. या संघासाठी यष्टीरक्षक म्हणून इंग्लंडच्या जोस बटलरची निवड करण्यात आलेली आहे.
या संघात पाच गोलंगाज निवडण्यात आले आहेत. या पाचपैकी दोन गोलंदाज हे अफगाणिस्तानचे आहेत. अफगाणिस्तानच्या रशिद खान आणि मोहम्मद नबी यांना या संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर भारताचा बुमरा आणि इंग्लंडचा डेव्हिड विली या संघात आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगालाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
विस्डनचा संघ : आरोन फिंच (कप्तान), कॉलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर (विकेटकीपर), मोहम्मद नबी, डेविड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
Web Title: Rohit Sharma was dropped from the wisden Twenty-20 squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.