ठळक मुद्देहे सारे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण रोहित कसा या दौऱ्यावर जाऊ शकतो, हे जाणून घेऊया.
बंगळुरु : सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघासाठी डोकेदुखी ठरत आहे ती यो-यो टेस्ट. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडला गेला, पण त्यानंतर झालेल्या यो-यो टेस्टमुळे काही क्रिकेटपटूंना दौऱ्यांना मुकावे लागले आहे. रोहित शर्मादेखील फिटनेस टेस्टमध्ये नापास ठरला होता. पण तो मात्र या दौऱ्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. हे सारे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण रोहित कसा या दौऱ्यावर जाऊ शकतो, हे जाणून घेऊया.
आयपीएलच्या दरम्यान भारतीय खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली होती. त्यावेळी काही खेळाडू यामध्ये नापास ठरले होते. भारताचा सलामीवीर रोहित शर्माही या टेस्टमध्ये त्यावेळी नापास ठरला होता. त्यामुळे अन्य नापास झालेल्या खेळाडूंप्रमाणे रोहितही इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण तसे होताना मात्र दिसत नाही. नापास ठरूनही रोहित या दौऱ्यावर कसा जातोय, यामागे काही राजकारण आहे का, नेमकं या प्रकरणात घडलं तरी काय हे जाणून घेऊया.
आयपीएलच्या वेळी रोहितची फिटनेस टेस्ट घेतली गेली होती. त्यामध्ये रोहित नापास ठरला होता. त्यानंतर रोहितने अजून एका फिटनेस टेस्टसाठी आजची तारीख मागून घेतली होती. कारण जेव्हा अन्य खेळाडूंची यो-यो टेस्ट झाली तेव्हा तो रशियामध्ये एका खासगी कामासाठी गेला होता. रोहित फिटनेस टेस्टमध्ये नापास ठरल्यामुळे त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्याचे ठरवण्यात येत होते. पण कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितची यो-यो टेस्ट कशी होते, ते पाहू, असे म्हटले होते.
रशियामधून भारतात परतल्यावर रोहित बंगळुरुमध्ये यो-यो टेस्ट देण्यासाठी दाखल झाला. या यो-यो टेस्टमध्ये रोहित पास झाला. त्यामुळे पहिल्या फिटनेस टेस्टचा विचार न करता रोहितला यो-यो टेस्टच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या संघात स्थान देण्यात आले.
Web Title: Rohit Sharma, who failed the fitness test, will go on a tour of England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.