रोहित शर्मालान्यूझीलंडमध्ये वनडे मालिकेत दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघारही घेतली होती. पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवातही झाली नसली तरी रोहित मुंबई इंडियन्ससाठी जिममध्ये घाम गाळायला लागला आहे. मुंबई इंडियन्सनेच रोहितचा जिममध्ये व्यायाम करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खेळाडू संघापेक्षा लीगला जास्त महत्व देतात, असे यापूर्वी आपण फुटबॉलमध्ये पाहिले आहे. पण आता ही गोष्ट क्रिकेटमध्येही पाहायला मिळत आहे. आयपीएलसाठी काही खेळाडू भारतीय संघाबरोबर खेळत नसल्याची खंत काही चाहत्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. काही खेळाडू सध्या विश्रांती घेत असून त्यांना भारतीय संघापेक्षा आयपीएल महत्वाचे असल्याचे चाहते म्हणत आहेत.
दुखापतीमुळे रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेरहिटमॅन’ रोहित शर्माला माऊंट मोनगानुईमध्ये पाचव्या व अखेरच्या टी२० सामन्यादरम्यान पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी एकदिवसीय व कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहितला स्नायूच्या दुखापतीचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे तो मालिकेतून बाहेर झाला असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले. ४१ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केल्यानंतर रोहित या लढतीतून रिटायर्ड हर्ट झाला होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘तो दौºयातून आऊट झाला आहे. सध्या त्याची स्थिती विशेष चांगली भासत नाही. फिजिओ त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, याबाबत नंतर माहिती मिळेल. पण तो मालिकेतील उर्वरित सामन्यात सहभागी होणार नाही.’ भारतीय संघ बुधवारपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल.
रोहित दुखापतग्रस्त झाल्यानंतर मयांक अगरवालचा एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेटमध्ये राखीव सलामीवीर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही तो राखीव सलामीवीर फलंदाज होता. न्यूझीलंड ‘अ’विरुद्ध भारत ‘अ’ संघांच्या सध्या सुरू असलेल्या अनौपचारिक कसोटी मालिकेत द्विशतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिल यालाही संघात स्थान मिळू शकते.
एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती पर्यायी खेळाडूच्या नावाची घोषणा करेल. पण त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कारण निवड समितीचे समन्वयक बीसीसीआय सचिव जय शाह खजिनदार अरुण धुमलसह न्यूझीलंडला जात आहेत. सूत्राने सांगितले की, ‘सचिवांची स्वीकृती मिळाल्यानंतरच पर्यायी खेळाडूची घोषणा होेईल.’ कसोटीत अनुभवी लोकेश राहुलला सलामीची संधी मिळेल, तर राखीव सलामीवीर स्थानासाठी गिल व पृथ्वी शॉ दावेदार असतील.
उपचारादरम्यान रोहितला वेदनारोहितची दुखापत किती गंभीर आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण सामन्यादरम्यान ज्यावेळी फिजिओ नितीन पटेल त्याच्यावर उपचार करीत होते त्यावेळी त्याला बऱ्याच वेदना होत असल्याचे दिसत होते. रोहितची दुखापत भारतासाठी मोठा धक्का आहे.