जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका दौ-यात कसोटी मालिका आणि चार एकदिवसीय सामन्यात सुपर फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माला अखेर वनडे मालिकेतील पाचव्या सामन्यात सूर गवसला आहे. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौ-यातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. रोहितने त्याच्या अर्धशतकी खेळीत सात चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत.
भारतीय खेळपट्टयांवर खो-याने धावा करणा-या रोहितच्या बॅटमधून आफ्रिकेतील खेळपटट्यांवर धावा जणू आटल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर चौफर टीका सुरु होती. दक्षिण आफ्रिका दौ-याआधी मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहितने एका वनडेमध्ये दोनशे धावा फटकावल्या होत्या. रोहितने वनडेमध्ये आतापर्यंत तीनवेळा द्विशतक झळकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
कसोटी मालिकेत रोहित वारंवार अपयशी ठरुनही त्याला संघात का स्थान दिले जाते ? त्याच्याजागी अजिंक्य रहाणेला चान्स द्या अशी मागणी क्रिकेटप्रेमी करत होते. त्यामुळे तिस-या कसोटीत रोहितच्या जागी अजिंक्यला संधी मिळाली. अजिंक्यनेही मिळालेल्या संधीचा लाभ उठवत दुस-या डावात 48 धावा केल्या. त्या धावा भारताला आघाडी मिळवून देण्यात निर्णायक ठरल्या.
जाणून घ्या रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौ-यातील कामगिरी
पहिली कसोटी रोहित शर्मा पहिला डाव 11 धावा दुसरा डाव 10 धावा दुसरी कसोटी रोहित शर्मा पहिला डाव 10 धावा दुसरा डाव 47 धावा पहिली वनडे रोहित शर्मा 20 धावा दुसरी वनडे रोहित शर्मा 15 धावा तिसरी वनडे रोहित शर्मा 0 धावा चौथी वनडे रोहित शर्मा रोहित शर्मा 5 धावा