नवी दिल्ली: टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जवळपास एक आठवड्यानंतर माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी मंगळवारी भावनिक पोस्ट शेअर केली. विश्वविजेतेपदात द्रविड यांचेही मोठे योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने २००७ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.
दरम्यान, जेतेपदानंतर रोहितने त्याच्या पोस्टमध्ये राहुल द्रविडसोबतचे फोटो शेअर केले. एक खुले पत्रही लिहिले आहे. द्रविड आणि रोहित यांची प्रशिक्षक-कर्णधार ही जोडी तीन वर्षापासून भारतीय संघाचे नेतृत्व करीत होती. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहितकडे नियमित कर्णधारपद आले. द्रविड यांनादेखील त्यानंतरच मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त आले होते. द्रविड हेयर करण्याढ़ विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद सोडणार होते, मात्र रोहित शर्माने त्यांना फोन कॉल करीत टी-२० विश्वचषकापर्यंत जबाबदारी सांभाळण्याची विनंती केली. या फोन कॉलबद्दल द्रविड यांनी रोहितचे अलीकडे आभारही मानले होते. द्रविड आणि रोहित यांची प्रशिक्षक-कर्णधार ही जोडी तीन वर्षांपासून भारतीय संघाचे नेतृत्व करीत होती.
काय आहे पत्रात...
रोहितने लिहिले की, प्रिय राहुल भाई, मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत होतो, पण मला खात्री नाही की मला ते सापडतील, त्यामुळे हा माझा प्रयल. कोट्यवधि लोकांप्रमाणेच मीदेखील तुझ्याकडे आदर्श म्हणून लहानपणापासून पाहत आलो. पण मी नशीबवान होतो की मला तुझ्याबरोबर इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाली. तू या खेळाचा खरोखर एक दिग्गज आहेसः पण तरीही तू तुझे कौतुक आणि यश दाराबाहेर ठेवून आमचा प्रशिक्षक म्हणून आत आलास, तुझ्याशी संवाद साधताना आम्हाला कधीही अडचण येणार नाही, याची तू काळजी घेतलीस. सर्व गोष्टींनंतरही तुझ्यातील माणुसकी आणि तुझे खेळाप्रति असलेले प्रेम हीच तुझी सर्वांत मोठी देणगी आहे. मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे आणि मी प्रत्येक आठवण आनंदाने अपेन. माझी पत्नी तुला माझी 'वर्क वाइफ' (कामाच्या ठिकाणची पत्नी) असे म्हणते. मी नशीबवान आहे की मीही तुला तसेच संबोधतो. आयसीसी ट्रॉफीची एकमेव कमी तुझ्याकडे होती. मी आनंदी आहे की आपण ही ट्रॉफी सांघिक कामगिरीच्या बळावर जिंकू शकलो. राहुल भाई, तुला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणायला मिळणे हा एक विशेष सन्मान मानतो.'