नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा वन-डे आणि टी-२० संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणी पास झाला. याचसोबत गेल्या दोन दिवसांपासून रोहित शर्माच्या संघातील सहभागाबद्दल असणारा संभ्रम अखेर दूर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठरवून दिल्याप्रमाणे किमान गुण मिळवत आपली जागा पक्की केली आहे.दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणे याला पर्यायी खेळाडू म्हणून सज्ज राहण्यासाठी सांगितले होते.रोहितने फिटनेस चाचणीनंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फिटनेस चाचणी पास झाल्यानंतरचा फोटो शेअर केला. रोहित आता भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.सुरुवातीला भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. मात्र या निकालानंतर अजिंक्य रहाणेच्या विश्वचषकातील संघात स्थान मिळवण्याच्या आशा आता धुसर झाल्या आहेत. आयपीएलमध्ये रोहित शर्माला फारशी चमकदार कामगिरी करताआली नव्हती. त्यामुळे यो-योफिटनेस चाचणी पासकेल्यानंतर रोहित इंग्लंड दौºयात कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.(वृत्तसंस्था)>‘हीटमॅन’चे थेट उत्तर...चाचणी पास केल्यानंतर रोहितने आपल्या तंदुरुस्तीवर प्रश्न निर्माण करणाºया प्रसारमाध्यमाच्या एका वर्गाला ट्वीटरद्वारे थेट उत्तर दिले. रोहित म्हणाला की, ‘मी माझा वेळ कुठे आणि कसा व्यतित करतो, याकडे कोणलाही लक्ष देण्याची गरज नाही. जोपर्यंत मी नियमांचे पालन करतो, तोपर्यंत मला माझ्याप्रमाणे वेळ घालविण्याचा अधिकार आहे. कामाच्या मुद्यांवर चर्चा करा. काही वाहिन्यांना सांगू इच्छितो की, यो - यो चाचणीत पास होण्यासाठी मला एक संधी मिळाली आणि ही संधी आजची होती.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रोहित शर्मा यो- यो चाचणीत पास...
रोहित शर्मा यो- यो चाचणीत पास...
भारतीय क्रिकेट संघाचा वन-डे आणि टी-२० संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणी पास झाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:55 AM