शतक पूर्ण झालं, तरी नो सेलिब्रेशन! Rohit Sharma चा हा Video सर्वांना करतोय इमोशनल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल जल्लोष होता, निराशा होती अन् क्रिकेट हा खेळ जिंकल्याचा आनंदही होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:18 PM2024-04-15T15:18:20+5:302024-04-15T15:18:38+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma's Act After Scoring Century In Losing Cause Shows His True Class, Watch Emotional Video | शतक पूर्ण झालं, तरी नो सेलिब्रेशन! Rohit Sharma चा हा Video सर्वांना करतोय इमोशनल

शतक पूर्ण झालं, तरी नो सेलिब्रेशन! Rohit Sharma चा हा Video सर्वांना करतोय इमोशनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल जल्लोष होता, निराशा होती अन् क्रिकेट हा खेळ जिंकल्याचा आनंदही होता... महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते आणि माहीने ४ चेंडूंत तुफान फटकेबाजी करून चाहत्यांना खूश केले. त्यात रोहित शर्माच्या शतकाने सामन्याला वरच्या दर्जावर पोहोचवले. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रोहितचं शतक सेलिब्रेट करावं, की आपल्या संघाच्या पराभवाचं दुःख करत बसावं हेच कळेनासे झाले होते. सध्या रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो पाहून फक्त रोहित फॅनच नव्हे तर सारेच इमोशनल झाले आहेत.  

लक्ष्य गाठण्यासारखे होते, पण...! हार्दिक पांड्या कुठे चुकलो हे सांगायचं सोडून CSK बाबत...  

कर्णधार ऋतुराज गायकवाड ( ६९) व शिबम दुबे ( ६६*) यांच्या ९० धावांच्या जोडीने CSK चा पाया भक्कम केला. MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा कुटल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, इशान किशन ( २३) आणि रोहित शर्मा यांनी ७ षटकांत ७० धावा जोडल्या. पण, मथिशा पथिराणाने मॅच फिरवली. रोहित व तिलक वर्मा यांनी ६० धावा जोडून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा पथिराणा आडवा आला. शार्दूल ठाकूर व तुषार देशपांडे यांनी १५ व्या १६व्या षटकात मिळून फक्त ५ धावा दिल्याने MI वरील दडपण वाढले. 


रोहितने ६१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले, परंतु पराभव अटळ आहे, हे माहित असल्याने त्याने शतकाचे सेलिब्रेशन नाही केले.

 
रोहित ६३ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला. मुंबईला ६ बाद १८६ धावा करता आल्या. पथिराणाने २८ धावांत ४ विकेट्स घेतल्या.  

Web Title: Rohit Sharma's Act After Scoring Century In Losing Cause Shows His True Class, Watch Emotional Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.