वर्ल्डकप 2023 सुरू असतानाच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. अहमदाबादेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर रोहित पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबईला गेला होतो. तो तेथे दोन दिवस आपल्या कुटुंबीयांसोबत राहिला. यानंतर, मंगळवारी तो पुन्हा संघात सामील झाला. मात्र, मुंबईहून पुण्याला जाताना त्याने आपली आलिशान स्पोर्ट्स कार तब्बल 200 किमी प्रति तास अथवा त्याहूनही अधिक वेगाने चालविली. यासाठी त्याला तीन चालानही बजावण्यात आले आहेत.
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आपल्या लेम्बोर्गिनी उरसने मुंबईहून पुण्याला गेला. वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रवासादरम्यान रोहित शर्माने वाहतुकीचे नियम मोडले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्याने अत्यंत वेगाने कार चालवली. या एक्स्प्रेस वेवरील वेग मर्यादा ताशी 100 किलोमीटर एवढी आहे. मात्र त्याने याहूनही दुप्पट वेगाने कार चालवली.
ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित ने कधी-कधी 200 किमी/तास हून अधिक, तर कधी-कधी 215 किमी/तास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवली. या मुळे, त्याच्या कारच्या नंबर प्लेटवर तीन ऑनलाइन ट्रॅफिक चालान जारी करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाच्या एका सूत्रांने दिलेल्या माहिती नुसार, "वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय कर्णधाराने एवढ्या वेगाने कार चालवणे अयोग्य आहे. त्याने संघाच्या बसनेच प्रवास करायला हवा आणि त्याच्या सोबत पोलिसांची गाडीही असायला हवी.