Join us  

Rohit Sharma Coach: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका", रोहित शर्माच्या कोचचं मोठं विधान!

रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी भारतीय संघावर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 2:45 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाला ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. यावरून रोहित सेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक दिग्गजांनी रोहित शर्माला कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला. अशातच रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एक मोठे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जर भारतीय संघाला २०२३चा वनडे विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यांना आयपीएलपासून दूर राहावे लागेल, असे लाड यांनी म्हटले आहे. दिनेश लाड यांनी स्पोर्टकीडाशी संवाद साधताना म्हटले, "मागील ७-८ महिन्यांपासून हा संघ स्थिर नाही. जर आपण विश्वचषकाची तयारी करत असू तर संघाला एकजूट दाखवावी लागेल. कोणीही सलामीला खेळत आहे, तर कोणीही गोलंदाजी करत आहे त्यामुळे मला स्थिरता दिसत नाही."

वर्कलोड मॅनेजमेंट हे कारण असू शकत नाही दिनेश लाड यांनी अधिक सांगितले की, "वर्कलोड मॅनेजमेंट हे कारण आहे असे मला वाटत नाही. जगभरात प्रत्येकजण क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे तुम्ही वर्कलोडचे कारण बनवू शकत नाही. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आयपीएलमध्ये खेळू नका. मला वाटते की त्यांनी प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेतला पाहिजे. कारण त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी कधीही तडजोड केली नाही पाहिजे."

"तो त्यांचा निर्णय आहे" - दिनेश लाड खेळाडूंनी आयपीएलमधून नाव माघे घ्यावे की नाही हे मी ठरवू शकत नाही. त्यांनीच यावर निर्णय घ्यायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही भारताकडून किंवा एखाद्या राज्यासाठी खेळता तेव्हाच तुमच्या नावाचा विचार आयपीएलसाठी केला जातो. तुमची कामगिरी तुम्हाला आयपीएलमधील मानधनाच्या कॅपमध्येच मदत करते, असे दिनेश लाड यांनी आणखी सांगितले.   

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयपीएल २०२२
Open in App