मुंबई : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील सदस्यांना पुरेशी विश्रांती मिळावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2019) भारताच्या प्रमुख खेळाडूंनी काही सामने विश्रांती घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. कर्णधार विराट कोहलीनं आयपीएलमध्ये विश्रांती करायची की नाही हा निर्णय प्रत्येक खेळाडूंनी स्वतःच्या तंदुरुस्तीनुसार घ्यावा, असा सल्ला दिला. उपकर्णधार रोहित शर्मानेही हेच मत व्यक्त केले, परंतु भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंना आयपीएलमध्ये विश्रांती नकोय, असेही रोहित म्हणाला.वर्ल्ड कपस्पर्धेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंची तंदुरूस्ती ही बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवरील कामाचा तणाव कमी व्हावा यासाठी बीसीसीआय संघमालकांशी चर्चा करणार आहे. खेळाडूंनीही राष्ट्रीय जबाबदारी लक्षात ठेवून आयपीएलमधील तणावाचा विचार करून खेळावे, अशा सूचना बीसीसीआयनं दिल्या आहेत. रोहितनं सांगितले की त्याच्यासह भारतीय संघातीन अन्य खेळाडूही दीर्घकालीन विचार करत आहेत आणि त्यानुसार गरज वाटेल तेव्हा ते विश्रांती घेणार आहेत. तो म्हणाला,''गेले काही वर्ष आम्ही सातत्यानं क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे आपले शरीर काय सांगते याचा विचार करायला हवा. जर मला विश्रांती घ्यावीशी वाटली, तर ती मी घेणार. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यामुळे आम्हाला आमचे प्राधान्य माहित आहे.'' ''भारतीय संघात सध्या खेळत असलेल्या काही खेळाडूंशी मी चर्चा केली. तेही आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्याचवेळी तंदुरूस्तीवरही लक्ष ठेवून आहोत,''असे 31 वर्षीय रोहित म्हणाला. मुंबईत सामने कधी?24 मार्च : मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई 13 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई5 मे : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई
मुंबईबाहेरील सामने
28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली6 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली20 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई28 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता