Join us  

शुभमन गिलबाबत लोक आता जे बोलतायत, ते रोहित २०२० मध्येच म्हणाला होता; ट्विट व्हायरल

शुभमन गिलच्या द्विशतकीय खेळीनंतर सोशल मीडियावर त्याला भारतीय क्रिकेट संघाचं पुढील Future म्हणून संबोधले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 8:39 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझिलंडच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलने रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी केली. त्याने १४९ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी केली आणि भारताची धावसंख्या ३४९ धावांपर्यंत पोहोचवली. २३व्या वर्षी असा पराक्रम करताना द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. 

रोहित शर्माने तीन द्विशतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व इशान किशन यांनीही द्विशतकी खेळी केली आहे. इशान किशनने २४ वर्ष व १४५ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते, शुभमनने २३ वर्ष व १३२ वर्षांचा असताना हा पराक्रम करून द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान पटकावला. 

शुभमन गिलच्या या द्विशतकीय खेळीनंतर सोशल मीडियावर त्याला भारतीय क्रिकेट संघाचं पुढील Future म्हणून संबोधले जात आहे. भारतीय संघात सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यानंतर शुभमन गिल पुढील काळात क्रिकेट विश्वात आपले नाव गाजवू शकतो, असं सांगितले जात आहे. याचदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे एक जूने ट्विट व्हायरल होत आहे. शुभमन गिलला जे आता लोक बोलताय, ते रोहित शर्माने २०२० रोजीच सांगितले होते.

३० एप्रिल २०२० रोजी शुभमन गिलने रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त ट्विट करत #Hitman पेक्षा चांगला पुल शॉट कोणीही करू शकत नाही... असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता. यावर धन्यवाद Future असं रोहितने शुभमनच्या ट्विटला रिप्लाय दिला होता. 

दरम्यान, शुभमन गिलने सामना संपल्यानंतर खुलासा केला की, त्याला द्विशतक होईल अशी अपेक्षा नव्हती. पण ४७ व्या षटकात दोन षटकार मारल्यानंतर त्याला आत्मविश्वास आला की हे शक्य आहे. जे चेंडू माझ्याकडे येत होते तेच मी खेळत होतो. सामना सुरु होण्याआधी बाहेर जाऊन मला काय करायचे आहे हे दाखवण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो. गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता असते, मी तेच करत होतो. त्यामुळे गोलंदाजांवर दडपण आले, असं शुभमन गिलने सांगितले. इशान किशन माझ्या सर्वोत्तम जोडीदारांपैकी एक आहे. त्याने वनडेत द्विशतक झळकावले तेव्हा मी तिथे होतो आणि ते विशेष होते. जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचे असते आणि ते नियमितपणे येत असते तेव्हा छान वाटते. या द्विशतकानंतर निश्चितच समाधानाची भावना वाटत असल्याचं शुभमन गिलने सांगितले.

टॅग्स :रोहित शर्माशुभमन गिलसोशल व्हायरल
Open in App