Join us  

रोहित शर्माला संघात स्थान देणे म्हणजे जुगार - इयान चॅपेल

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघात काय बदल करायला हवेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 4:03 PM

Open in App
ठळक मुद्देया वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

नवी दिल्ली : भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. भारताचे हे दोन्ही पराभव फलंदाजीमुळे झाले आहेत, असा काही जाणकारांचे म्हणणे आहे. आता या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात काय बदल करायला हवेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

चॅपेल म्हणाले की, " इंग्लंडच्या दौऱ्यात भारताला फलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाला काही संधी मिळाल्या होत्या, पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. कारण त्यांच्या फलंदाजांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जर त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये चांगला कामगिरी करायची असेल तर त्यांना संघात बदल करावे लागतील. " 

चॅपेल यांनी यावेळी रोहित शर्माच्या फलंदाजीची स्तुती केली. रोहितबद्दल ते म्हणाले की,  " रोहित हा एक गुणी फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर तो एक आदर्श फलंदाज आहे. पण त्याला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला संघात घेणे हा एक जुगार ठरू शकतो.  " 

टॅग्स :रोहित शर्माआॅस्ट्रेलिया