मुंबई : भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आहे आणि त्याला कारण त्यांची दोन महिन्यांची कन्या समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
तो म्हणाला,'' या बातमीनं मी भावनिक झालो आहे. हा क्षण माझ्यासाठी खास आहे. गेंड्यांचं संरक्षण हा माझ्या हृदया जवळचा विषय आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून असा गौरव होणे, हे आमचे भाग्यच. आफ्रिकेतील एका मादी गेंड्याला आमच्या कन्येचं नाव देण्यात आलं, यावर विश्वास बसत नाही.''
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला अखेरीस मुलगी समायराला वेळ देण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहितला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानंतर तो मायदेशी परतला आणि त्यामुळे त्याला सिडनी कसोटीत खेळता आले नव्हते. त्यानंतर वन डे मालिकेसाठी तो आठवडाभरात पुन्हा ऑस्ट्रेलियात परतला. त्यानंतर जवळपास महिनाभर तो मुलीपासून दूर होता. त्यानंतर मायदेशात परतताच रोहितने मुलीसोबत वेळ घालवला. रोहितची पत्नी रितिकाने इंस्टाग्रामवर समायराचा व्हिडीओ शेअर केला.