मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुढची लढत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे. मुंबई इंडियन्सला यंदाच्या पर्वात काही खास कामगिरी करता आली नाही आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तो पहिला संघ ठरला. MI ला १२ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवता आले आहेत आणि उर्वरित दोन सामने जिंकून शेवट गोड करण्याचा त्यांना निर्धार आहे. पण, हे पर्व हार्दिक पांड्याला नेतृत्वाची जबाबदारी दिल्यामुळे गाजलं... फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या रोहितला दिलेली वागणुक योग्य नसल्याची त्यांची भावना आहे.
फ्रँचायझीच्या या निर्णयाने रोहितही नाराज असल्याची चर्चा रंगली होती आणि त्याच्यासह जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव यांनी हार्दिकच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली होती. त्यात रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यावरून रोहितची नाराजी स्पष्ट दिसत आहे. अभिषेक नायरसोबतच्या व्हिडीओ रोहित बदलाचा विचार असल्याचे म्हणतोय आणि या संवादाच्या शेवटी हे आपले शेवटचे पर्व असेही त्याने म्हटले आहे. यावरून रोहित मुंबई इंडियन्स फ्रँचायझीबद्दलच बोलत असावा, असा अंदाज लावला गेला आहे. KKR ने हा व्हिडीओ पोस्ट केला होता, परंतु चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून त्यांनी तो डिलिट केला.
''एक एक चीज चेंज हो रहा है.. वो उनके उपर है... जो भी है वो मेरा घर है भाई, वो मंदिर जो हैना मैने बनवाया है ( एकेक करून गोष्टी बदलत आहेत. ते त्यांच्यावर आहे. मात्र, भावा ते माझं घर आहे. हे मंदिर मी बांधलं आहे.),''असे रोहित बोलतोय. या व्हिडीओच्या शेवटी रोहित म्हणाला, भाई मेरा क्या मेरा तो ये लास्ट है ( माझं हे शेवटचं वर्ष आहे, तसेही )