Rishabh Pant Accident: "असं करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", रोहितची पत्नी पत्रकारांवर भडकली 

ritika sajdeh instagram: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:04 PM2022-12-30T18:04:18+5:302022-12-30T18:05:24+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma's wife Ritika Sajdeh shames journalists for sharing photos of Rishabh Pant's accident | Rishabh Pant Accident: "असं करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", रोहितची पत्नी पत्रकारांवर भडकली 

Rishabh Pant Accident: "असं करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", रोहितची पत्नी पत्रकारांवर भडकली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे पंतला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. 

दरम्यान, रिषभ पंतच्या अपघाताचे विचित्र आणि भयावह फोटो समोर येत आहेत. यावरूनच आता रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिने नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर रितीकाने पत्रकारांना जबाबदार धरत त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. जखमी ऋषभ पंतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावरून रितिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली, ज्यामधून तिने पत्रकारांना फटकारले आहे. 

रितीकाने पत्रकारांवर साधला निशाणा 
रितिकाने तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून लिहले, "कोणत्याही व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. यावेळी ते शेअर करायचे की नाही हे देखील तुम्ही ठरवू शकत नाही. त्याचे कुटुंब आणि मित्र यांच्यावर यामुळे खूप मोठा परिणाम झाला आहे. एक तर पत्रकारिता असते आणि साधी असंवेदनशीलता असते." 

रेलिंगवर आदळली कार
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या परिश्रमानंतर कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्लीहून रुरकीला येताना अपघात
शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता त्यावेळी हा अपघात घडला. रिषभ पंतचे घर रुरकीमध्येच आहे. त्याची कार नरसन शहराजवळ असताना गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रेलिंग, खांब तोडून कार उलटली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Rohit Sharma's wife Ritika Sajdeh shames journalists for sharing photos of Rishabh Pant's accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.