Join us  

कांगारुंविरोधात असा पराक्रम करणारा रोहित जगातील पहिलाच खेळाडू

बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 8:36 PM

Open in App

बंगळुरु - बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. कांगारुंविरोधात बंगळुरुत त्यानं रहाणेबरोबर पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यानंतर तो बाद झाला. रोहितनं  55 चेंडूत 65 धावांची खेळी केली.  या खेळीदरम्यान त्यानं 5 उतुंग षटकार लगावले. दुसरा षटकार लगावतात ऑस्ट्रेलियाविरोधात वन-डेत त्यानं षटकारांच अर्धशतक पुर्ण केलं. 

सिक्सर लगावण्याची बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्यात रोहित शर्मा सर्वात पुढे आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरूद्ध 43 आंतरराष्ट्रीय सामन्यात 44 खेळींमध्ये एकूण 70 सिक्सर लगावले आहेत. 

ऑस्ट्रेलिया विरूद्धचा हा रोहितचा27 वा वन-डे सामना होता. या सामन्यात त्याने हा खास रेकॉर्ड त्याच्या नावावर केलाय. वन-डेत रोहितनंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वात जास्त सिक्सर लगावणारा दुसरा खेळाडू इंग्लंडचा इयॉन मोर्गन हा आहे. त्याने आतापर्यंत 43सामन्यामध्ये 39 षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वाधिक सिक्सर लगावणा-या दुसरा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर हा आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध 71 वनडे सामन्यांमध्ये 35 षटकार लगावले आहेत.

 

21 धावांवर बाद झाला कोहली, तरीही केला हा 'विराट' विक्रम

थे सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्याला नाथन कूल्टर नाईलनं बाद केलं. कर्णधार म्हणून सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी. डीव्हिलियर्स याच्या नावावर होता. माजी कर्णधार एम. एस. धोनीनं कर्णधारपदाचा राजिनामा दिल्यानंतर पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर आली होती. कर्णधार म्हणून खेळताना कोहलीनं 36 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार केला.  ए.बी. डीव्हिलियर्स (41), क्लार्क (47), धोनी/मॉर्गन (48), गांगुली/इंझमाम (49) आणि व्ही. रिचर्डस् (50) यांच्या नावावर हा विक्रम होता.  

उमेश यादवचे 100 बळी पूर्णदीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन केलेला भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादवने आज नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बंगळुरुत ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात त्यानं आपल्या वन-डे कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत. कांगारुंचा कर्णधार स्मीथला बाद करताच त्याच्या नावार हा विक्रम झाला. वन-डेमध्ये 100 बळी घेणारा तो भारताचा 18 वा गोलंदाज आहे. त्यानं हा पराक्रम 71 व्या सामन्यात केला आहे. भारताकडून सर्वात कमी वन-डे सामन्यात 100 बळी पूर्ण करण्याच्या यादीत उमेश सहाव्या स्थानावर आहे. सर्वात कमी वन-डेत 100 बळी घेण्याचा विक्रम इरफान पठानच्या नावावर आहे. इरफाननं 59 वन-डेत 100 बळी घेतले आहेत. त्यानंतर जहीर खान (65), अजित अगरकर (67), जवागल श्रीनाथ (68) आणि इशांत शर्मा (70) यांचा क्रमांक लागतो. 

100 व्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी उतरल्यानंतर 100 वा सामना खेळणारा तो ऑस्ट्रेलियचा 28 खेळाडू ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथचा 100 सामना होता. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगनं 374 सामने खेळले आहेत. बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत वॉर्नरनं 103चेंडूचा सामना करताना आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्यानं 10 चौकार आणि 3 षटकार लगावले.   

टॅग्स :रोहित शर्माबीसीसीआयआॅस्ट्रेलियाक्रिकेट