रोहितचा 'फ्लॉप शो'; पाच सामन्यांत ५० धावाही करता आल्या नाहीत!

केएल राहुलला सलामीसाठी संधी देण्याची शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 06:00 PM2018-03-12T18:00:59+5:302018-03-12T20:39:15+5:30

whatsapp join usJoin us
Rohit's 'Flop Show'; Five runs out of 50 | रोहितचा 'फ्लॉप शो'; पाच सामन्यांत ५० धावाही करता आल्या नाहीत!

रोहितचा 'फ्लॉप शो'; पाच सामन्यांत ५० धावाही करता आल्या नाहीत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली -  निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत आज भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ तयार आहे. पण भारतीय संघासाठी सलामीवीर रोहित शर्माचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. एकीकडे दुसरा सलामीवीर शिखर खोऱ्यानं धावा काढत असताना रोहित मात्र फ्लॉप होत आहे.

रोहितला गेल्या पाच सामन्यांत 50 धावाही करता आल्या नाहीत. गेल्या पाच सामन्यात रोहित शर्माने 17, 0 ,11, 0 आणि 21 अशा धावा केल्या आहेत.  रोहित शर्माशिवाय पंतही दोन्ही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने दोन सामन्यात 7 आणि 23 धावा केल्या आहेत. त्यामुळं आज होणाऱ्या लंकेविरोधातील सामन्यात त्याला खेळवण्याबाबात विचार केला जाईल.  रोहित शर्मा स्वत: मधल्या फळीत फलंदाजीसाठी येऊ शकतो आणि केएल राहुलला सलामीसाठी शिखर धवनसोबत पाठवण्याचा जुगार खेळण्याची चिन्हे आहेत. 

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलला आयसीसीनं दोन सामन्यासाठी निलंबित केलं आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर विजय मिळवला होता. पण शनिवारी मात्र श्रीलंकेला बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 

निदाहास चषकातील दोन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक झळकाले होतो. तो सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्याने कामगिरीत सातत्य राखणे, भारतासाठी महत्वाचे असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांना मात्र अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. कारण या अनुभवी खेळाडूंकडून अजूनही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. त्याचबरोबर ऋषभ पंत, मनीष पांडे, दिनेश कार्तिक यांनाही अजून छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये विजय शंकर आणि जयदेव उनाडकट हे सातत्याने भेदक मारा करत आहेत. शार्दुल ठाकूर पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने अचूक मारा केला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल हे फिरकीपटू आपली कामगिरी चोख बजावत आहे. भारताने या सामन्यात पुन्हा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. 

प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वाश्ािंग्टन सुंदर, यजुवेंंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत (विकेटकीपर).

श्रीलंका :  सूरंगा लकमल (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुसाल जनिथ परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजय, अमिला अपोंसो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामीरा, धनंजय डि सिल्वा.

 

Web Title: Rohit's 'Flop Show'; Five runs out of 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.