भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि महान फलंदाज विराट कोहली यांच्यासाठी गेले वर्ष अत्यंत चढ-उतारांचे गेले. दोघेही टी-२० विश्वचषक जिंकून शिखरावर पोहोचले खरे, मात्र, वर्षाच्या अखेरीस, त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्याचाही सामना करावा लागला. २०२४-२५ च्या कसोटी हंगामात भारताची कामगिरी फारच खराब राहिली. यामुळे संघ पहिल्यांदाच WTC फायनलमध्ये स्थान मिळवू शकला नाही. या खराब कामगिरीचा केंद्रबिंदू होता रोहित आणि कोहलीचा खराब फॉर्म आणि जसप्रीत बुमराह वगळता गोलंदाजीचा अभाव.
रोहित आणि कोहलीसंदर्भात वेगवेगळा निर्मय -
माजी भारतीय विकेटकीपरनं अथवा यष्टीरक्षक-फलंदाज दीप दासगुप्ता यासंदर्भात बोलताना म्हणाले, "रोहितच्या भविष्यासाठी पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे असतील आणि मानकही कोहलीच्या तुलनेत वेगळे असतील. रोहित आणि विराटला एकत्र क्लब करू नका. भारतीय क्रिकेटच्या गत पिढीत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड जसे वेगळे होते, त्याच प्रमाणे आपल्याला प्रत्येक खेळाडूचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करावे लागेल." दासगुप्ता स्टार स्पोर्ट्सवर बोलत होते.
रोहितसाठी पुढील पाच महिने महत्वाचे -
दीप दासगुप्ता म्हणाले, "रोहित शर्मासाठी पुढील पाच महिने, प्रामुख्याने इंटरनॅशनल व्हाइट-बॉल क्रिकेट आणि आयपीएलच्या दृष्टीने, महत्वाचे असणार आहेत. या फॉरमॅटमधील त्याचे प्रदर्शन निर्णायक ठरेल. याशिवाय त्याचा फर्स्ट क्लास क्रिकेट फॉर्म, फिटनेस आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीसारखे घटक देखील महत्त्वाचे असतील. अंतिम निर्णय निवडकर्त्यांचा असेल."
टेस्ट सीरीजमधील विराट-रोहितचे आकडे -
२०२४-२५ च्या कसोटी हंगामासंदर्भात बोलायचे झाल्यास, या हंगामात कोहलीने १९ डावांमध्ये २२.४७ च्या सरासरीने एकूण ३८२ धावा केल्या. यांपैकी एका डावात त्याने शतक केले आहे. म्हणजेच, त्याने १८ डावांमध्ये केवळ २८२ धावा केल्या आहेत. रोहितच्या कामगिरीचा विचार करता, त्याची आकडेवारी फारच चिंताजनक आहे. त्याने १५ डावांमध्ये १०.९३ च्या सरासरीने केवळ १६४ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. रोहित आता ३७ वर्षांचा आहे आणि आगामी वर्ल्डकप सायकल संपेपर्यंत तो ४० वर्षांचा असू शकतो.
Web Title: Rohit's future will be decided in 5 months What will happen to Virat Former wicketkeeper compares him to 2 legendary cricketers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.