- अयाझ मेमन
कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर टी२० मालिकेतही यजमान टीम इंडियाने श्रीलंकेचा सहज धुव्वा उडवला. रोहित शर्मा, लोकेश राहुल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट अशा अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडत संघाच्या विजयात योगदान दिले. आता भारतीय संघ आगामी दक्षिण आफ्रिका दौºयासाठी सज्ज असतानाच या मालिकेतील प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीचे विश्लेषण जेष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी केले आहे...
>रोहित शर्मा
धुवाधार कामगिरी केलेल्या रोहितने दुसºया टी२० सामन्यात जबरदस्त शतक झळकावताना श्रीलंकन संघाला चौकार, षटकारांचा तडाखा दिला. त्याचवेळी त्याने चतुर नेतृत्व करताना श्रीलंकेला ३-० असा ‘क्लीनस्वीप’ही दिला.
>मनिष पांड्ये
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामना जिंकून देण्यात मनिषने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सध्या संघातील जागा पक्की करण्यासाठी त्याला अशीच खेळी करावी लागेल. क्षेत्ररक्षण जबरदस्त होते.
>महेंद्रसिंग धोनी
फलंदाजीमध्ये बढती देण्यात आल्यानंतर धोनीने अपेक्षेप्रमाणे फटकेबाजी करत लक्ष वेधले. एकदम मनमोकळेपणे फलंदाजी करताना त्याने जुन्या धोनीची आठवण करुन दिली. तसेच यष्ट्यांच्या मागे अफलातून कामगिरी झाली.
>हार्दिक पांड्या
सर्वच मध्य व तळाच्या फलंदाजांप्रमाणे हार्दिकलाही फलंदाजीमध्ये फारसे काही करण्याची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजीमध्ये पूर्ण योगदान देताना मालिकेत ६ बळी मिळवले. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणातही शानदार कामगिरी केली.
>युझवेंद्र चहल
फलंदाजांनी दडपणाखाली येत चहलचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी चौफेर फटकेबाजी केल्याने तो कुलदीपच्या तुलनेत महागडा ठरला. परंतु, चहलने ८ बळी घेत कोण वरचढ ठरला हे सिद्ध केले.
>जसप्रीत बुमराह
मालिकेत बुमराह एकही बळी घेऊ शकला नाही, याचेच आश्चर्य वाटते. खूप जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यातच, मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर बुमराहला तिसºया सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली.
>मोहम्मद सिराज
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सामन्याप्रमाणेच पहिल्या टी२० सामन्यातही त्याला कमी षटके गोलंदाजीसाठी मिळाली. वेगवान मारा करण्याची क्षमता असतानाच, अचानकपणे हळू चेंडू टाकण्याची कला सिराजकडे आहे. पण, कोणता चेंडू कधी टाकावा हे त्याला शिकावे लागेल. हा देखील भविष्यात स्टार ठरु शकतो.
>लोकेश राहुल
एकदिवसीय सामन्यातील अपयशातून चांगल्याप्रकारे स्वत:ला सावरुन घेत त्याने रोहितप्रमाणेच आक्रमक खेळी केली. दुर्दैवाने आगामी दक्षिण आफ्रिका दौºयात त्याची एकदिवसीय संघात निवड झाली नाही.
>श्रेयस अय्यर
पहिल्या दोन सामन्यांत
चांगली सुरुवात केली खरी, पण या मालिकेत आपली छाप पाडण्यात श्रेयस अपयशी ठरला. त्याने नक्कीच आपल्यातील गुणवत्ता दाखवली, परंतु श्रेयसला मोठी खेळी करावी लागेल.
>दिनेश कार्तिक
आघाडीची फळी शानदार फॉर्ममध्ये असल्याने कार्तिकला फलंदाजीमध्ये फारशी संधी मिळाली नाही. पण अखेरच्या सामन्यातील त्याचे योगदान महत्त्वाचे ठरले. धोनीला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून कार्तिकचे खूप महत्त्व आहे.
>जयदेव उनाडकट
उनाडकट या मालिकेतील ‘शोध’ ठरला. त्याने वेग, कौशल्य आणि लाइन - लेंथवरील अप्रतिम नियंत्रण याजोरावर मारा केला. त्याची इकॉनॉमी रेट काहीसा जास्त राहिला, पण स्ट्राइक रेट जबरदस्त होता. तो क्रिकेटच्या इतर प्रकारामध्येही महत्त्वाचा ठरु शकतो.
>कुलदीप यादव
कुलदीपने मालिकेत घेतलेले ६ बळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. जेव्हा संघाला गरज होती, नेमकी तेव्हाच कुलदीपने बळी घेत सामन्याचे चित्र पालटले.
>वॉशिंग्टन सुंदर
टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १८ वर्षीय वॉशिंग्टनने गोलंदाजीमध्ये डावाच्या सुरुवात करताना कोणतेही दडपण घेतले नाही. अप्रतिम नियंत्रण दाखवतानाच, त्याने आक्रमक मारा केला. हा भविष्यातला स्टार ठरु शकतो.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: Rohit's leadership and uneven bowling were notable
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.