केपटाऊन : ‘गेल्या काही सामन्यांतील फॉर्म पाहूनच रोहित शर्माची अजिंक्य रहाणेच्या जागी अंतिम संघामध्ये निवड करण्यात आली होती,’ असे सांगत कर्णधार विराट कोहलीने रोहितची पाठराखण केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर रहाणेचा संघात समावेश करण्याबाबत चर्चा रंगली.कोहलीने सामना झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले, ‘आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीकडे पाहून निवड केली होती. रोहितने मागील तीन कसोटी सामन्यांत धावा काढल्या असून तो चांगली फलंदाजी करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने धावा केल्या होत्या.’‘खेळामध्ये जर-तर अशा चर्चा होतच राहतील. पण आम्ही ज्या योजनेने संघनिवड केली होती, त्यात खेळाडूंचा वर्तमान फॉर्म महत्त्वाचा मुद्दा होता,’ असेही कोहलीने या वेळी म्हटले. चार वर्षांपूर्वी रहाणे आफ्रिका दौºयात यशस्वी ठरला होता. त्या वेळी त्याने चेतेश्वर पुजारा (२८०) आणि विराट कोहली (२७२) यांच्यानंतर सर्वाधिक २०९ धावा काढल्या होत्या.(वृत्तसंस्था)कोहलीवर नियंत्रण राखण्याची रणनीती होती : फिलँडरकारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना सहा बळी घेणारा फिलँडर म्हणाला, ‘विराट शानदार फलंदाज असून त्याच्यावर अंकुश राखणे गरजेचे आहे. आम्ही तेच केले.’कोहली बाद झाल्यानंतर काही टिप्पणी केली का, याबाबत बोलताना फिलँडर म्हणाला, ‘नाही, मी त्याला काहीच म्हटले नाही. मी माझ्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावितहोतो आणि आम्ही त्यावरच फोकस करतो. विराटची विकेट महत्त्वाची आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही जल्लोष करीत होतो.’भारतापुढे केवळ २०८ धावांचे लक्ष्य होते आणि वेगवान गोलंदाजांवर संघाला सुस्थिती गाठून देण्याची जबाबदारी होती. याबाबत बोलताना फिलँडर म्हणाला, ‘केवळ २०८धावांचे लक्ष्य असताना कुणा एकाला जबाबदारी स्वीकारावी लागते. दुसºयावर अवलंबून असणे शक्य नसते. कारण कदाचित त्यानंतर संधी मिळेल किंवा नाही, हे सांगता येत नाही.’फिलँडरने आर. आश्विनलाही बाद केले. त्याने ३७ धावांची खेळी करीत भारताला संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भारताची एकवेळ ७ बाद ८२ अशी अवस्था होती, पण आश्विन व भुवनेश्वर यांनी आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली.फिलँडर म्हणाला, ‘अशा वेळी संयम राखणे आवश्यक असते. अखेरच्या तीन विकेट घेता येतील, याची आम्हाला कल्पना होती. संयम राखणारा संघ जिंकेल, आम्ही तेच केले.’भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातविजयाचा शिल्पकार ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेर्नोन फिलँडरने सांगितले, की भारतीय कर्णधार विराट कोहलीवर नियंत्रण राखण्याची रणनीती होती व त्यात आम्ही यशस्वी ठरलो.भारताला २०८ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर मी काहीसा निराश होतो. मला माहीत होते, की नवीन चेंडू आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आणि जर नव्या चेंडूने बळी मिळवण्यात यशस्वी ठरलो, तर भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडता आले असते, असा विश्वास होता. भारताकडे अनेक दर्जेदार खेळाडू आहेत, पण दबाव निर्माण केल्यानंतर आम्ही त्यांना पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. पण मी थोडा चिंतीत होतो हे मात्र नक्की. आम्ही ३५० च्या आसपास आघाडी मिळवू, अशी अपेक्षा होती.- फाफ डू प्लेसिस, कर्णधार, दक्षिण आफ्रिकापुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने निराश असलो तरी, येत्या सहा आठवड्यांत मी पुन्हा धावायला लागेन, असा विश्वास आहे. पायांवर आता जास्त जोर टाकू शकत नसल्याने सध्या मी कुबड्यांवर अवलंबून आहे. वेगवान गोलंदाज फ्रंटफूटवर जास्त वजन टाकतात आणि मला दुखापतीतून सावरण्यासाठी किमान सहा आठवडे लागतील. आॅस्टेÑलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पुनरागमन करण्याचे लक्ष्य बाळगले आहे.- डेल स्टेन, वेगवान गोलंदाज, दक्षिण आफ्रिका
- Cricket Buzz»
- बातम्या»
- फॉर्म बघूनच रोहितची निवड, कर्णधाराने केली ‘हिटमॅन’ची पाठराखण
फॉर्म बघूनच रोहितची निवड, कर्णधाराने केली ‘हिटमॅन’ची पाठराखण
‘गेल्या काही सामन्यांतील फॉर्म पाहूनच रोहित शर्माची अजिंक्य रहाणेच्या जागी अंतिम संघामध्ये निवड करण्यात आली होती,’ असे सांगत कर्णधार विराट कोहलीने रोहितची पाठराखण केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर रहाणेचा संघात समावेश करण्याबाबत चर्चा रंगली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:09 AM