रोहितच्या मायदेशात सुपरफास्ट तीन हजार धावा, मोडला विराटचा विक्रम 

पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने आज जबरदस्त फलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 04:38 PM2019-03-10T16:38:39+5:302019-03-10T16:39:02+5:30

whatsapp join usJoin us
Rohit's super-fastest 3,000 ODI runs in home, Virat's record breaks | रोहितच्या मायदेशात सुपरफास्ट तीन हजार धावा, मोडला विराटचा विक्रम 

रोहितच्या मायदेशात सुपरफास्ट तीन हजार धावा, मोडला विराटचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली -  पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने आज जबरदस्त फलंदाजी केली. 95 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या रोहितचे शतक हुकले. मात्र तत्पूर्वी रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. या खेळीदरम्यान रोहितने भारतीय मैदानावरील आपल्या तीन हजार धावा पूर्ण केल्या. त्याबरोबरच घरच्या मैदनांवर वेगात तीन हजार धावा फटकावण्याचा विराट कोहलीचा विक्रमही रोहितने मोडीत काढला.
 
रोहित शर्माने एकूण 57 डावांमध्ये 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याबरोबरच रोहितने घरच्या मैदानावर सर्वात जलद तीन हजार धावा पूर्ण करण्याच्या हाशिम अमलाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. याआधी भारताकडून विराट कोहलीने 63 डावंमध्ये तर सौरव गांगुलीने 69 डावांतमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

 दरम्यान, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आज भारतीय संघाला जबरदस्त सलामी दिली. दोघांनीही मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत 193 धावांची सलामी दिली. या सलामीच्या जोरावर भारतीय संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या उभारली.  

Web Title: Rohit's super-fastest 3,000 ODI runs in home, Virat's record breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.