महिलेनं स्टेडियममध्ये दिला बाळाला जन्म; Live मॅच वेळी धावफलकावर झळकला 'मातृत्वाचा आनंद'

आणखी एका कपलनं रोमँण्टिक अंदाजातील प्रेमाच्या खेळानं वेधून घेतलं सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:46 IST2024-12-23T12:39:55+5:302024-12-23T12:46:46+5:30

whatsapp join usJoin us
Romantic proposal and baby birth at Wanderers during 3rd ODI between SA and PAK | महिलेनं स्टेडियममध्ये दिला बाळाला जन्म; Live मॅच वेळी धावफलकावर झळकला 'मातृत्वाचा आनंद'

महिलेनं स्टेडियममध्ये दिला बाळाला जन्म; Live मॅच वेळी धावफलकावर झळकला 'मातृत्वाचा आनंद'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Baby Born At The Wanderers Stadium And Another Couple Got Engaged During Pink Day ODI : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पिंक डे वनडे सामना एकदम खास आणि लक्षवेधी ठरला. हा सामना सुरु असताना स्टेडियमध्ये दोन खास गोष्टी घडल्या. ज्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं दक्षिण आफ्रिकेला व्हाइट वॉश करून दाखवण्याचा पराक्रम करत इतिहास रचला तो सामना सुरु असताना एका महिलेनं स्टेडियममध्ये बाळाला जन्म दिला. एवढेच नाही तर आणखी एका कपलनं रोमँण्टिक अंदाजातील प्रेमाच्या खेळानं सर्वांच लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

अन् मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलेनं स्टेडियममवर दिला बाळाला जन्म

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना जोहान्सबर्गच्या स्टेडियमवर खेळवण्यात आला. या मॅचवेळी स्टेडियम स्टँडमध्ये उपस्थितीत प्रेक्षकांपैकी एक असलेल्या महिलेसंदर्भात अद्भूत घटना घडली. कारण मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलेनं स्टेडियममध्येच मातृत्वाचा आनंद अनुभवला. तिने तिथेचं आपल्या बाळाला जन्म दिला. क्रिकेट मॅच सुरु असताना घडलेली ही कदाचित पहिलीच घटना असेल. आयोजकांनी स्कोअरकार्डवर मिस्टर अँण्ड मिस रबेंग या जोडीला बेबी बॉय झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्याचा सीनही मग पाहायला मिळाला. स्टेडियममधील मेडिकल टीमच्या डॉक्टरांच्या मदतीने संबंधित महिलेनं बाळाला जन्म दिला.   

सोशल मीडियावर रंगली चर्चा, अशा उमटल्या प्रतिक्रिया

स्टेडियममध्ये घडलेल्या या घटनेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते. गर्भवती महिलेला गर्दीच्या  मॅच पाहण्यासाठी घेऊन जाणं चुकीचं आहे, अशा काही प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. दुसरीकडे स्टेडियममध्ये जन्मलेल्या बाळासाठी जगभरातील मॅचेससाठी आजीवन मुक्त प्रवेश देण्यासाठी पास मिळायला हवा, अशा काही मजेशीर कंमेंटही उमटल्याचे पाहायला मिळते. 

बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा खेळही आला चर्चेत

बेबी बॉयच्या जन्माशिवाय या मॅचवेळी आणखी एका कपलनं प्रेमाचा खेळ दाखवून देत लक्षवेधून घेतले. पिंक डे एकदिवसीय सामन्याचा  गुलाबी माहोलमध्ये एकानं स्टेडियममध्ये आपल्या गर्लफ्रेंडला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. त्याने प्रेमाची निशाणी म्हणून दिलेली अंगठी स्विकारत तिनेही प्रेमाला होकार दिला.  

Web Title: Romantic proposal and baby birth at Wanderers during 3rd ODI between SA and PAK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.