Join us  

कोहली, गांगुलीनंतर न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नोंदवला 'हा' विक्रम

झीलंडच्या रॉस टेलरने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:00 AM

Open in App

डुनेडीन, न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश : न्यूझीलंडच्यारॉस टेलरने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 330 धावांचा डोंगर उभा केला आणि त्यात टेलरच्या 69 धावांचा समावेश आहे. त्याने या खेळीसह न्यझीलंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. या सामन्यात टेलरने वन डे क्रिकेटमधील 8000 धावांचा पल्लाही ओलांडला. दरम्यान, न्यूझीलंडने हा सामना जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.टेलरने 82 चेंडूंत 7 चौकार खेचून 69 धावांची खेळी केली. त्याने आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप स्पर्धेत 8021 धावा केल्या. या कामगिरीसह तो न्यूझीलंडकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. टेलरने माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा ( 8007)  विक्रम मोडला. याशिवाय जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने 203 डावांमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

Most ODI runs for New Zealand:या विक्रमात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याने 175 डावांमध्ये 8 हजार धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स ( 182 डाव) आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( 200 डाव) यांचा क्रमांक येतो. मात्र, त्याला फ्लेमिंगच्या एका विक्रमाने हुलकावणी दिली. फ्लेमिंगने जागतिक एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना 30 धावा केल्या होत्या आणि त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या किवी फलंदाजांत टेलर अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी त्याला 11 धावांची गरज आहे. या विक्रमी कामगिरीनंतर टेलर म्हणाला,''लोकांनी केलेल्या अभिनंदनाने भारावून गेलो. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजाचा विक्रम नावावर केल्याचा अभिमान वाटतो.''  

न्यूझीलंडच्या 330 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 242 धावांवर माघारी परतला. 

 

 

टॅग्स :रॉस टेलरन्यूझीलंडविराट कोहलीसौरभ गांगुली