Join us  

राऊंड रॉबिन लीगमुळे रंगत वाढली

विश्वचषक स्पर्धेची गोष्टच वेगळी आहे आणि यजमान जर इंग्लंंड असेल, तर काय सांगायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 4:17 AM

Open in App

- सौरव गांगुली लिहितात...विश्वचषक स्पर्धेची गोष्टच वेगळी आहे आणि यजमान जर इंग्लंंड असेल, तर काय सांगायचे. १२ वी विश्वचषक स्पर्धेत राऊंड रॉबिन लीग फॉर्मेटमुळे रंगतदार होणार आहे. माझ्यासाठी हा सर्वांत आवडता फॉर्मेट आहे. त्यात चांगल्या संघालाच आगेकूच करण्याची संधी राहील. चार दिग्गज संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भविष्यातही हाच फॉर्मेट कायम राहील, अशी आशा आहे.आॅस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन केले. कांगारूंविरुद्ध भारतीय संघाच्या चमकदार कामगिरीचा मी भरपूर आनंद घेतला. दरम्यान, आॅस्ट्रेलियाच्या निराशाजनक कामगिरीचे मला दु:खही होते. दरम्यान, त्यांनी नाट्यमयरीत्या पुनरागमन करीत स्वत:ला सिद्ध केले आहे. सध्या इंग्लंड अधिक बलाढ्य आहे. अशा स्थितीत त्यांना मायदेशात खेळण्याचा लाभ नक्कीच मिळेल.सध्याचा विंडीज संघ बघितल्यानंतर आनंद होत आहे. प्रशासक व खेळाडूंदरम्यान असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे संघाची दावेदारी मजबूत झाली. अशा स्थितीत अनुभवी क्रिस गेलसह युवा शाय होप, हेटमेयर, निकोलस पूरन यांनी चैतन्य आणले आहे. पाकिस्तानकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्यात सातत्याचा अभाव असू शकतो, पण सूर गवसल्यानंतर त्यांना रोखणे अवघड असते. प्रतिभावान खेळाडूंची वानवा नसून बेदरकार खेळण्याच्या शैलीमुळे ते अधिक धोकादायक ठरतात.टीम इंडियातही काही विशेषता व काही उणिवा आहेत. सर्वांत मोठी शक्ती टॉप थ्री आहेत. त्यात विराट कोहलीमुळे संघ अधिक मजबूत झाला आहे. दरम्यान, संघाची कामगिरी मधल्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील. त्यात धोनीचा फॉर्म सर्वांत महत्त्वाचा ठरेल. तळाच्या फळीत कुलदीप, चहल, बुमराह आणि शमी यांच्यासारख्या खेळाडूंच्या समावेशामुळे मधल्या फळीची भूमिका महत्त्वाची ठरते. संघाची गोलंदाजीची बाजू संतुलित आहे. बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल तर शमीकडून त्याला चांगले सहकार्य लाभेल. चहल-कुलदीप यांचा फिरकी मारा मधल्या षटकांमध्ये बळी घेण्यासाठी सहायक ठरेल. यामुळे भारत मजबूत आहे. (गेमप्लॅन)