- रोहित नाईक
एकाहून एक सरस खेळाडूंचा समावेश असलेला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघ मोक्याच्या वेळी कच का खातो, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना नेहमी पडतो. कागदावर जरी हा संघ अत्यंत तगडा दिसत असला, तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र या संघाची झुंज अपयशी ठरताना दिसते. सांघिक कामगिरीचा असलेला अभाव आरसीबीच्या पराभवास कारणीभूत ठरतो.
कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोन दिग्गजांसोबत अॅरोन फिंच, मोईन अली, ख्रिस मॉरिस, युझवेंद्र चहल, डेल स्टेन अशी स्टार मंडळी असून यंदा आरसीबीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. धडाकेबाज फिंचला संघात घेतल्याने आरसीबीकडून तुफानी सुरुवातीची अपेक्षा आहे. आरसीबीची फलंदाजी जितकी मजबूत आहे, तितकीच गोलंदाजी कमजोर ठरते. डेथ ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करणाऱ्या गोलंदाजांची कमतरता या संघाला भासते. परंतु, यंदा चित्र वेगळे दिसेल असा विश्वास आरसीबी संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
आयपीएलच्या पहिल्याच सत्रात शेवटून दुसºया स्थानी राहिलेल्या आरसीबीने पुढच्याच वर्षी उपविजेतेपद पटकावले. आतापर्यंत आरसीबीला २००९, २०११ आणि २०१६ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१७ सालापासून आरसीबीसाठी बादफेरी दूरच राहिली. गेल्या वर्षी आरसीबीला तळाच्या स्थानी समाधान मानावे लागले. सांघिक कामगिरी करण्यात यश मिळवले, तर आरसीबी प्रत्येक संघावर भारी ठरेल, हेही तितकेच खरे.
सर्वोत्तम कामगिरी : २००९, २०११ व २०१६ साली उपविजेते.
Web Title: Royal Challengers Bangalore; IPL 04 days left
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.