Join us  

IPL 2024: RCB च्या संघाचं नाव अन् लोगो बदलला; सलामीच्या सामन्यापूर्वी मोठी घोषणा

IPL 2024: आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 8:52 PM

Open in App

IPL 204 Latest News: २२ मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने मागील हंगामात गुजरात टायटन्सचा पराभव करून किताब जिंकला. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाचव्यांदा किताब जिंकला. विशेष बाब म्हणजे आयपीएल २०२४ ला सुरुवात होण्यापूर्वी आरसीबीच्या संघाचे नाव आणि लोगो बदलण्यात आला आहे. 

'रॉयल चॅलेंजर्स बँगलोर'च्या ऐवजी 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' असे नामकरण करण्यात आले आहे. याशिवाय आरसीबीच्या फ्रँचायझीने नवा लोगो देखील जाहीर केला आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आले नाही.

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल. 

IPL चे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक 

  1. २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  2. २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  3. २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  4. २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  5. २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  6. २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  7. २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  8. २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  9. २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  10. २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  11. ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  12. ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  13. ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  14. १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  15. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  16. ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  17. ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  18. ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  19. ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  20. ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२४विराट कोहली