नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी रॉयल चँलेजर्स बँगलोरने श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाला संघात सहभागी करून घेतले. भारतीय संघाविरोधात श्रीलंकेला टी२० मालिकेत विजय मिळवून देणाऱ्या वानिंदू याने मोठा वाटा उचलला होता. आरसीबीने भारतीय संघाविरोधात चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंना निवडण्याची परंपरा कायम राखली. हसारंगा हा टी२० रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यासोबतच दुष्मंता चमिरालाही निवडण्यात आले आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्सची जागा घेईल. हसारंगाला झाम्पाच्या जागी स्थान मिळाले आहे. बिग बॅशमध्ये शानदार खेळ करणाऱ्या टीम डेव्हिडला न्यूझीलंडविरोधात फिन एलेनच्या स्थानी संघात घेण्यात आले आहे. फ्रेंचायझीने याची माहिती दिली की, त्यांचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीच हे वैयक्तिक कारणांमुळे पदावरून दूर झाले आहे. त्यामुळे आता क्रिकेट संचालक माइक हेसन हे संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. भारतीय खेळाडू, सहयोगी स्टाफ आणि संघ व्यवस्थापन २१ ऑगस्ट रोजी बंगळुरूत एकत्र येणार आहे. त्यानंतर सर्वजण सात दिवस विलगीकरणात राहतील. त्या दरम्यान तीन दिवसांनी त्यांची कोविड तपासणी केली जाणार आहे. संघ त्यानंतर विशेष विमानाने बंगळुरूला रवाना होईल. अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्टाफ २९ ऑगस्टला संयुक्त अरब अमिरातीत एकत्र येणार आहे. तेथे सहा दिवसांचे विलगीकरण असेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रॉयल चॅलेजर्स बँगलोरने केले संघात मोठे बदल
रॉयल चॅलेजर्स बँगलोरने केले संघात मोठे बदल
आयपीएल, हसरंगा, चमिराचा समावेश, माईक हेसन नवे प्रशिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 5:47 AM