Join us  

IPL युद्धासाठी RCB चे नवे अस्त्र; 'विश्वविजयी महागुरू' देणार विराटसेनेला कानमंत्र

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी भारताला 2011 सालचा वन डे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या प्रशिक्षकांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:26 AM

Open in App

मुंबई -  इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी भारताला 2011 सालचा वन डे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या प्रशिक्षकांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीने गेली आठ वर्ष संघासोबत खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भुमिका पार पाडली. त्याच्या जागी प्रशिक्षकाची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवली आहे. 

दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर कर्स्टन यांनी 2018च्या सत्रात बंगळूरुच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. कर्स्टन यांच्याकडे जवळपास 700 सामन्यांचा (वन डे, कसोटी आणि प्रथम श्रेणी) अनुभव आहे आणि त्यांच्यानावावर एकूण 40,000 धावा आहेत. या निवडीनंतर कर्स्टन म्हणाले की,'व्हिटोरीच्या मार्गदर्शनाखाली मी मागील सत्रात फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पाहिली. व्हिटोरीकडून बरेच काही शिकायला मिळाले. बंगळूरुसोबतच्या पुढचा प्रवास अनुभवण्यासाठी मी आतुर आहे. माझ्या क्षमतेनुसार संघाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल.' व्हिटोरीने सांगितले की,'बंगळूरुसोबतचा आठ वर्षांचा प्रवास अविस्मरणीय होता. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' 

टॅग्स :इंडियन प्रीमिअर लीगक्रिकेट