Join us

नव्या कर्णधारासह उतरणार रॉयल्स, सनरायझर्स !

डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या दोन्ही आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ उद्या एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:31 IST

Open in App

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या दोन्ही आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ उद्या एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. नव्या नेतृत्वात संघ कशी कामगिरी करतील, याची उत्सुकता असेल. राजस्थान रॉयल्स संघ निलंबनाच्या कारवाईनंतर दोन वर्षांनंतर पुनरागमन करीत आहे. राजस्थानचे नेतृत्व अजिंक्य रहाणे याच्याकडे तर हैदराबादचा कर्णधार म्हणून केन विलियम्सन जबाबदारी सांभाळणार आहे. हे दोघेही नवे कर्णधार असून ते संघाला विजयी सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ आता कागदारवर संतुलित दिसत आहेत. लिलावात सनरायझर्सने आपल्या अधिकाधिक खेळाडूंना कायम राखण्यात यश मिळवले. दुसरीकडे, लिलावात कमी खर्च करणाऱ्या रॉयल्सने बेन स्टोक्स (१२.५ कोटी) आणि जयदेव उनाडकट (११.५ कोटी) या खेळाडूंवर मात्र सर्वाधिक पैसा खर्च केला आहे. हे दोन्ही खेळाडू सत्रातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.शेन वॉर्न राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक म्हणून परतला आहे. त्यामुळे २००८ नंतर या संघातील खेळाडू वॉर्नच्या उपस्थितीत संघाला गौरव मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. २००८मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद राजस्थान संघाने पटकाविले होते. दुसरीकडे, २०१६ मध्ये आयपीएल जिंकणारा हैदराबाद संघ वॉर्नरच्या अनुपस्थितीत खेळत आहे. तो नसल्यामुळे फलंदाजी क्रमात रिकामी जागा आहे. अ‍ॅलेक्स हेल्सहा शिखर धवनसोबत चांगली सुरुवात करुन देण्यात सक्षम आहे. असेअसले तरी त्याची उणीव संघाला भासेल. (वृत्तसंस्था)>समतोल संघसनरायर्झ हैदराबाद संघाचा मध्यक्रम मजबूत करण्यासाठी मनीष पांडे आणि युसूफ पठाण संघात आहेत. तसेच भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा यांच्यामुळे वेगवान गोलंदाजी मजबूत झाली आहे.

टॅग्स :आयपीएल 2018सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्स