शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) दुसऱ्याच षटकात कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) चा निर्णय योग्य ठरवला. आर्चरच्या चेंडूवर लेग साईटला टोलावलेला फटका यशस्वी जैस्वालनं शॉर्ट मिडविकेटवर अचूक टिपला. चांगल्या फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ( 19) यालाही आर्चरनं बाद केले. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारणाऱ्या पृथ्वीला दुसऱ्याच षटकात आर्चरने कट अँड बोल्ड केले. DCचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( 22) सहाव्या षटकात जैस्वालनं भन्नाट थ्रो करून धावबाद केले.
Rajasthan Royals Team - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन, महिपाल लोम्रोर, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, अँड्य्रू टाय, वरूण आरोन
RR - वरुण आरोन, अँड्य्रू टाय ( IN); अंकित राजपूत, टॉम कूरन ( OUT)
Delhi Capitals Team - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरीच नॉर्ट्जे, हर्षल पटेल.
2018 मध्ये पर्पल कॅपचा मान पटकावणारा अँड्य्रू टाय आज राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करत आहे... गुजरात लायन्सकडून IPLमध्ये पदार्पण करताना त्यानं रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध हॅटट्रिकसह 5/17 अशी कामगिरी केली होती.
पाहा व्हिडीओ...
Web Title: RR vs DC Latest News : Brillient fielding from Yashasvi Jaiswal; DC captain Shreyas Iyer run out, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.