RR vs DC Latest News : शिखर धवन-श्रेयस अय्यरनं दिल्लीला सावरले, राजस्थानसमोर तगडे आव्हान ठेवले

जोफ्रा आर्चरनं दिल्लीला अवघ्या १० धावांवर दोन धक्के दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 14, 2020 09:13 PM2020-10-14T21:13:22+5:302020-10-14T21:15:32+5:30

whatsapp join usJoin us
RR vs DC Latest News: RR vs DC Latest News : Innings Break! DC (161/7) have set a target of 168 runs for RR | RR vs DC Latest News : शिखर धवन-श्रेयस अय्यरनं दिल्लीला सावरले, राजस्थानसमोर तगडे आव्हान ठेवले

RR vs DC Latest News : शिखर धवन-श्रेयस अय्यरनं दिल्लीला सावरले, राजस्थानसमोर तगडे आव्हान ठेवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात आज इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील ३०वा सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सनं ( RR) सुरुवात तर दणक्यात केली, परंतु त्यांना DCच्या तगड्या फलंदाजांनी चोपून काढले. २ बाद १० अशा अवस्थेत असलेल्या दिल्लीसाठी शिखऱ धवन आणि श्रेयस अय्यर यांनी धाव घेतली आणि राजस्थान समोर तगडे आव्हान उभे करून दिले. 

दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, जोफ्रा आर्चरनं दिल्लीला अवघ्या १० धावांवर दोन धक्के दिले. पृथ्वी शॉ ( ०) पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला, तर रहाणे ( २) तिसऱ्या षटकात रॉबीन उथप्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला.

गब्बरचा आक्रमक पवित्रा पाहून तो आज मोठी खेळी करण्याच्या दृढ निश्चयानेच आलाय, असेच वाटत होते. धवननं ३३ चेडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा चोपल्या. श्रेयस गोपाळनं त्याला बाद केले. पण, गब्बरनं या खेळीसह दोन मोठे विक्रम मोडले. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक ५४९ चौकारांचा विक्रम नावावर केला. त्याशिवाय IPLमध्ये सर्वाधिक अर्धशतक मारणाऱ्या भारतीय फलंदाजाचाही विक्रम नोंदवला. धवनचे हे ३९वे अर्धशतक ठरले. त्याच्यानंतर विराट कोहली ( ३८), रोहित शर्मा ( ३८) आणि सुरेश रैना ( ३८) यांचा क्रमांक येतो. डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक ४९ अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे.  

धवन माघारी गेल्यानंतर अय्यरनं दमदार फटकेबाजी केली. त्यानं कर्णधार म्हणून IPLमध्ये १००० धावांचा पल्ला पार केला आणि अशी कामगिरी करणारा तो १३वा खेळाडू ठरला.  अय्यरनं ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक त्यागीनं त्याला बाद केले. अय्यरने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकांसह ५३ धावा केल्या. दोन सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि अॅलेक्स कैरी यांनी दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. स्टॉयनिस १८ धावांवर माघारी परतला. RRकडून आर्चरनं ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ७ बाद १६१ धावा केल्या.

 

Web Title: RR vs DC Latest News: RR vs DC Latest News : Innings Break! DC (161/7) have set a target of 168 runs for RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.