Join us  

RR vs DD, IPL 2018 : राजस्थान रॉयल्सची दिल्लीवर दहा धावांनी मात; विजयाचे खाते उघडले

बुधवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमांनुसार दिल्लीपुढे सहा षटकांत 71 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. दिल्लीला हे अव्हान पेलवले नाही. दिल्लीला सहा षटकांमध्ये चार फलंदाजांच्या मोबदल्यात 60 धावा करता आल्या आणि राजस्थानने डकवर्थ-लुईस नियमांनुसार दहा धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 7:46 PM

Open in App

जयपूर : दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात करत राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलमधील विजयाचे खाते उघडले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमांनुसार दिल्लीपुढे सहा षटकांत 71 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. दिल्लीला हे अव्हान पेलवले नाही. दिल्लीला सहा षटकांमध्ये चार फलंदाजांच्या मोबदल्यात 60 धावा करता आल्या आणि राजस्थानने डकवर्थ-लुईस नियमांनुसार दहा धावांनी विजय मिळवला.

दिल्लीला पहिल्याच चेंडूवर कॉलिन मुर्नोच्या रुपात पहिला धक्का बसला . पण त्यानंतर ऋषभ पंत (20) ग्लेन  मॅक्सवेल (17) यांनी काही चांगले फटके मारले, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. दिल्लीला सहा षटकांमध्ये 60 धावा करता आल्या आणि राजस्थानने 10 धावांनी हा सामना जिंकला.

दिल्लीने नाणेफेक जिंकत राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केले. दुसऱ्याच षटकात सलामीवीर डी'आर्की शॉर्ट बाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. त्यानंतर बेन स्टोक्सने काही काळ फटकेबाजी केली, पण तो 16 धावांवर बाद झाला. राजस्थानची 2 बाद 28 अशी अवस्था असताना संजू सॅमसन फलंदाजीला आला आणि त्याने संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. सॅमसनने 22 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 37 धावा केल्या.

राजस्थानचा अजिंक्य रहाणेला यावेळी सूर सापडल्याचे दिसले नाही. स्टोक्स किंवा सॅमसन चांगली फलंदाजी करत होते. पण अजिंक्यला मात्र खेळपट्टीशी जुळवून घ्यायला थोडा वेळा लागला. स्थिरस्थावर झाल्यावर अजिंक्यने चांगली फटकेबाजी केली, पण त्याला अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. अजिंक्य मोक्याच्या क्षणी बाद झाला. कारण सॅमसन बाद झाल्यावर संघाला अजिंक्यच्या तडफदार फटकेबाजीची गरज होती. अजिंक्यने 40 चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर 45 धावा केल्या. पण त्यानंतर अठराव्या षटकाच्या पाचवा चेंडू झाल्यावर पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर सामना डकवर्थ-लुईस नियमांनुसार सहा षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीपुढे 71 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

12.33 PM : राजस्थान रॉयल्सचा दिल्लीवर विजय

12.28 PM : रीषभ पंत बाद; दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूंत 25 धावांची गरज

12.24 PM : ख्रिस मॉरीसचा चौकार

12.22 PM : तीन षटकांनंतर दिल्ली 2 बाद 36; विजयासाठी दोन षटकांत 35 धावांची गरज

12.20 PM : दिल्लीला मोठा धक्का; ग्लेन मॅक्सवेल बाद

12.15 PM : तिसऱ्या षटकात ग्लेन मॅक्सवेलची तडफदार फलंदाजी ; 14 धावांची वसूली

12.14 PM : ग्लेन मॅक्सवेलचा चौकार

12.10 PM : दोन षटकांनंतर दिल्ली 1 बाद 15

12.05 PM : दिल्ली एका षटकानंतर 1 बाद 10

12.03 PM : दुसऱ्या चेंडूवर रिषभ पंतचा चौकार

12.00 PM :  पहिल्याच चेंडूवर दिल्लीला धक्का; कॉलिन मुर्नो धावचीत

11.54 PM : दिल्लीपुढे सहा षटकांत 71 धावांचे आव्हान

11.50 PM : पाचएेवजी सहा षटकांचा सामना होणार

11.48 PM : दिल्लीला पाच षटकांमध्ये 61 धावांचे आव्हान

11.22 PM : पाऊस सुरु असल्याने सामन्याबाबतचा अंतिम निर्णय 12 वाजता घेण्यात येणार आहे.

10.55 PM : 11 वाजता मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार आहे.

 

 

9.26 PM : पावसाच्या आगमनामुळे सामना थांबला

- राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना थांबवावा लागला. त्यावेळी 17.5 षटकांमध्ये राजस्थानने 5 बाद 153 अशी मजल मारली होती.

9.23 PM : राजस्थानच्या 150 धावा पूर्ण

- मोहम्मद शमीच्या 17व्या षटकात राजस्थान रॉयल्सने दीडशे धावांची वेस ओलांडली.

9.21 PM :  दिल्लीच्या ख्रिस मॉरीसच्या 17 व्या षटकात 2 षटकार आणि एक चौकार

- ख्रिस मॉरीसच्या 17 व्या षटकात राजस्थानने एकूण 18 धावांची लूट केली. या षटकात राहुल त्रिपाठी आणि जोस बटलर यांनी दोन षटकार आणि एक चौकार वसूल केला.

9.15 PM : पंधरा षटकांनंतर राजस्थानची 4 बाद 117 अशी स्थिती

9.04 PM : अजिंक्य रहाणे OUT, राजस्थानला मोठा धक्का

- फिरकीपटू नदीमने अजिंक्यला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. अजिंक्यने पाच चौकारांच्या जोरावर 45 धावा केल्या.

8.58 PM : राजस्थानचे शतक पूर्ण; अजिंक्य रहाणेचा चौकार

- बाराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्यने चौकार वसूल करत संघाचे शतक फलकावर लावले.

8.52 PM : राजस्थानला तिसरा धक्का संजू सॅमसन OUT

- दमदार फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला दिल्लीचा फिरकीपटू शाहबाझ नदीमने त्रिफळाचीत केले. सॅमसनने 22 चेंडूत 37 धावा केल्या.

8.48 PM : दहा षटकांनंतर राजस्थान 2 बाद 84

- पहिल्या पाच षटकांत राजस्थानने 43 धावा करत दोन फलंदाज गमावले होते. पण त्यानंतरच्या पाच षटकांमध्ये राजस्थानने एकही बळी गमावला नाही आणि धावसंख्येत 41 धावांची भार घातली.

8.25 PM : पाच षटकांनंतर राजस्थान 2 बाद 43

- प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची पहिल्या पाच षटकांमध्ये 2 बाद 43 अशी स्थिती होती.

8.21 PM : पाचव्या षटकात राजस्थानला दुसरा धक्का; बेन स्टोक्स OUT

- ट्रेंट बोल्टने बेन स्टोक्सला यष्टीरक्षकाकरवी झेल बाद केले. स्टोक्सने एक षटकार आणि एक चौकाराच्या जोरावर 16 धावा केल्या.

8.09 PM : राजस्थानला पहिला धक्का; सलामीवीर डी'आर्की शॉर्ट OUT

- पहिल्या चेंडूवर चौकार फटकावल्यावर राजस्थानचा सलामीवीर डी'आर्की शॉर्ट धावबाद झाला.

8.08 PM : राजस्थान रॉयल्सचा दुसऱ्या षटकात पहिला चौकार

- शाहबाद नदीमच्या वैयक्तिक पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राजस्थानचा सलामीवीर डी'आर्की शॉर्ने चौकार वसूल केला.

 

7.30 PM : दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

- दिल्लीने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाझ नदीम यांना संघात स्थान दिले आहे. पण राजस्थानने मात्र संघात कोणताही बदल केलेला नाही.

 

 

दोन्ही संघ

दिल्ली डेअरडेव्हिल्स : गौतम गंभीर (कर्णधार), श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, कॉलिन मुन्रो, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.

 

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, डी'आर्की शॉर्ट, जतिन सक्सेना, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, स्टुअर्ट बिन्नी, हेनरिक क्लासेन, जोस बटलर, प्रशांत चोप्रा, संजू सॅमसन, अंकित शर्मा, अनुरीत सिंह, आर्यमान बिर्ला, बेन लॉघलीन, धवल कुलकर्णी, दुष्मांता चामीरा, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, सुधेशन मिथुन, झहीर खान, डी'आर्की शॉर्ट.

 

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण हा सामना जिंकून स्पर्धेतील विजयाचे खाते उघडण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.

टॅग्स :आयपीएल 2018राजस्थान रॉयल्सदिल्ली डेअरडेव्हिल्स