Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला. शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. नागरकोटीनं दोन विकेट्ससह दोन झेलही टिपले. त्यापैकी एक झेल तर अफलातून होता.
उभय संघ पहिल्यांदाच दुबईच्या स्टेडियमवर खेळत असल्यानं येथील खेळपट्टीचा दोघांनाही अंदाज नाही. KKRनं आज आंद्रे रसेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा डाव खेळला. पण, त्याला अपयश आलं. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. मॉर्गननं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) 30 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 3) आणि संजू सॅमसन ( 8) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व शिवम मावी यांनी माघारी पाठवले. जोस बटलर आज फॉर्मात वाटत होता. त्यानं दोन खणखणीत षटकारही खेचले, परंतु सातव्या षटकात शिवम मावीनं त्याला चतुराईनं बाद केलं. रॉबीन उथप्पाला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण, तो 2 धावांवर माघारी परतला. RRने 9 बाद 137 धावा केल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ...
Web Title: RR vs KKR Latest News : Phenomenal catch that is! Wow! K Nagarkoti is turning out to be a super package for KKR, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.