RR vs KKR Latest News : आजच्या सामन्यात KKRनं आंद्रे रसेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा डाव खेळला. पण, तो यशस्वी ठरला नाही. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं. पण, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. आंद्रे रसेलला ( Andre Russell) फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देणं KKRसाठी फलदायी ठरलं नाही. त्याला 14 चेंडूंत 24 धावा करता आल्या. त्यानंतर इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी फटकेबाजी केली. KKR ला 20 षटकांत 6 बाद 174 धावा करता आल्या. मॉर्गननं अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. त्यानं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) 30 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 3) आणि संजू सॅमसन ( 8) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व शिवम मावी यांनी माघारी पाठवले. जोस बटलर आज फॉर्मात वाटत होता. त्यानं दोन खणखणीत षटकारही खेचले, परंतु सातव्या षटकात शिवम मावीनं त्याला चतुराईनं बाद केलं. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण, त्याचा अपयशाचा पाढा आजही कायम राहिला. तो 2 धावांवर माघारी परतला. रियान पगाही त्याच षटकात कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) च्या गोलंदाजीवर बाद झाला. शुबमन गिलनं पॉईंटवर सुरेख झेल टिपला. मागील सामन्याचा हिरो राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) 14 धावांवर माघारी परतला.
या सामन्यात RRचा फलंदाज रॉबिन उथप्पाकडून मोठी चूक झाली. KKRच्या डावाच्या तिसऱ्या षटकात त्याच्याकडून ही चूक झाली आणि आता बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर IPL UAEत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बीसीसीआयनं काही नियमावलीही तयार केली. पण, त्याचे उथप्पाकडून उल्लंघन झाले. त्याने चेंडू चमकावण्यासाठी थुंकीचा वापर केला.
पाहा नेमकं काय झालं...
Web Title: RR vs KKR Latest News : Robin Uthappa spotted applying saliva on the ball during RR vs KKR clash in IPL 2020, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.