Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

RR vs KXIP Latest News : मयांक आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, अवघ्या दोन धावांनी त्यांना विक्रमाने हुलकावणी दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 10:46 PM2020-09-27T22:46:14+5:302020-09-27T22:47:49+5:30

whatsapp join usJoin us
RR vs KXIP Latest News : This is the best save I have seen in my life, Sachin Tendulkar on Nicholas Pooran Sensational fielding   | Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

Video : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात फलंदाजीबरोबरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचेही दर्शन झाले. निकोलस पूरनने ( Nicholas Pooran) अडवलेला षटकार हा तर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही ( Sachin Tendulkar) यानेही कौतुक केले. तो म्हणाला, माझ्या आयुष्यातील हे सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आहे. अविश्वसनीय! RR vs KXIP Latest News & Live Score

जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी RRच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवले. 15व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून मयांकनं IPLमधील पहिले शतक पूर्ण केले. RR vs KXIP Latest News & Live Score

17व्या षटकात टॉम कुरननं त्याला बाद केले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलही पुढच्या षटकात माघारी परतला. त्यानं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले. RR vs KXIP Latest News & Live Score

लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9व्या षटकात संपुष्टात आली. RRला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. RR vs KXIP Latest News & Live Score


आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन उत्तुंग फटका मारला, तो जवळपास षटकारच होता, परंतु निकोलस पूरनने ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं, ते पाहून रितेश देशमुखही अवाक् झाला. त्यानं सोशल मीडियावर पूरनचे कौतुक केले. 

पाहा व्हिडीओ...
 

Web Title: RR vs KXIP Latest News : This is the best save I have seen in my life, Sachin Tendulkar on Nicholas Pooran Sensational fielding  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.