Join us  

RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 10:01 PM

Open in App

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, अवघ्या दोन धावांनी त्यांना विक्रमाने हुलकावणी दिली.RR vs KXIP Latest News & Live Score

जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी RRच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवले. 15व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून मयांकनं IPLमधील पहिले शतक पूर्ण केले. RR vs KXIP Latest News & Live Score

17व्या षटकात टॉम कुरननं त्याला बाद केले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलही पुढच्या षटकात माघारी परतला. त्यानं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले. RR vs KXIP Latest News & Live Score

Highest partnerships for KXIP in IPL:206 धावा - अॅडम गिलख्रिस्त/शॉन मार्श वि. RCB, 2011183 धावा - मयांक अग्रवाल/लोकेश राहुल वि. RR, 2020148 धावा - शॉन मार्श/अझर महमूद वि. MI, 2013136 धावा - अॅडम गिलख्रिस्ट/पॉल व्हॅल्थॅटी वि. CSK, 2011 आयपीएलमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम मयांक-लोकेशला नोंदवता आला नाही. अवघ्या दोन धावांनी हा विक्रम हुकला. डेव्हिड वॉर्नर/जॉनी बेअरस्टो यांनी 2019मध्ये RCBविरुद्ध 185 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर गौतम गंभीर/ख्रिस लीन यांनी 2017मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद 184 धावांची भागीदारी केली होती. मयांक/लोकेश यांनी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या तिसऱ्या जोडीचा मान पटकावला. 

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video

मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्समयांक अग्रवाललोकेश राहुल